महापालिकेच्या १८ प्रभागांची आरक्षण सोडत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

लातूर - राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत व हरकतींसाठी विहित कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिला, इतर मागासप्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्‍चितीसाठी गुरुवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता प्रशासकीय इमारतीमधील डीपीसी हॉलमध्ये सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा २६ डिसेंबरला जाहीर होऊन हरकतींसाठी वेळ दिला जाणार आहे.

लातूर - राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत व हरकतींसाठी विहित कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिला, इतर मागासप्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्‍चितीसाठी गुरुवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता प्रशासकीय इमारतीमधील डीपीसी हॉलमध्ये सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा २६ डिसेंबरला जाहीर होऊन हरकतींसाठी वेळ दिला जाणार आहे.

शहराची २०११ च्या जनगणनेनुसार तीन लाख ८२ हजार ९४० लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पालिकेचे १८ प्रभाग होत असून, ७० नगरसेवकांची निवड होईल. मे २०१७ मध्ये होणाऱ्या बहुसदस्यीय निवडणुकीत १६ प्रभागांतून प्रत्येकी चार तर, दोन प्रभागांतून प्रत्येकी तीन सदस्य निवडले जातील. शासनाच्या १३ जूनच्या चक्रानुक्रमे पद्धतीचा आरक्षण निश्‍चितीसाठी आधार घेतला जात आहे. चार सदस्यीय प्रभागांची लोकसंख्या २२ ते २३ हजार तर, तीन सदस्यीय प्रभागांची लोकसंख्या १५ ते १६ हजार असणार आहे. 

यासंदर्भात प्रशासनाने अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणासह प्रारूप आराखड्याचा प्रस्ताव तयार होऊन २८ नोव्हेंबरला विभागीय आयुक्तांकडे व त्यानंतर एक डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर झाला. या प्रस्तावास १६ डिसेंबरला आयोगाकडून मान्यता मिळाली. अनुसूचित जाती व जमाती महिला, नागरिकांचा मागासप्रवर्ग व सर्वसाधारण महिलांचे आरक्षण निश्‍चितीसाठी सोडत काढण्यासंदर्भात सोमवारी (ता. १९) सूचना प्रसिद्ध झाली असून, गुरुवारी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यानंतर प्रारूप प्रभाग रचना २६ डिसेंबरला राजपत्रात प्रसिद्ध होईल व त्यानंतर नागरिकांना हरकती व दावे सादर करता येणार आहेत. 

त्यासाठी नऊ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. २५ जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत अधिकारी यांच्यामार्फत सुनावणी घेतली जाईल. त्यासाठी हरकती घेणाऱ्यांना स्वतंत्रपणे सुनावणीला बोलावले जाणार आहे. महापालिकेच्या आयुक्तांकडून शिफारसींसह प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे चार फेब्रुवारी २०१७ पर्यंत हरकती सादर केल्या जातील व त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेईल. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी आयोगाच्या निर्णयानुसार प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

नगरसेवकांच्या चर्चेला उधाण
निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे प्रशासनाने गोपनीय पद्धतीने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला आहे; मात्र गेल्या १५ दिवसांपासून बहुतांश नगरसेवक आपापल्या प्रभागांच्या रचनेसंदर्भात चर्चा करीत आहेत. कोणाचा प्रभाग कोणत्या भागाला जोडला, आपल्या प्रभागात आरक्षण कसे पडेल आणि भविष्यातील लढाई कशी होईल? याचा अंदाज घेतला जात आहे. सर्वसाधारण नागरिकही उत्सुकतेने चौकशी करीत आहेत. भविष्यातील प्रभाग रचनेवरून दावे आणि प्रतिदावे करीत चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: municipal ward reservation draw