या महापालिकेला ‘ओडीएफ अधिक’दर्जा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

परभणी : परभणी शहर ओडीएफ म्हणून जाहीर झाल्यानंतर आता सर्वेक्षणाअंती बुधवारी (ता. १३) शासनाच्या वतीने परभणी महापालिका क्षेत्र ‘ओडीएफ अधिक’ दर्जा म्हणून घोषीत झाले आहे. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणात अनुदान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

परभणी : परभणी शहर ओडीएफ म्हणून जाहीर झाल्यानंतर आता सर्वेक्षणाअंती बुधवारी (ता. १३) शासनाच्या वतीने परभणी महापालिका क्षेत्र ‘ओडीएफ अधिक’ दर्जा म्हणून घोषीत झाले आहे. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणात अनुदान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत परभणी शहर यापूर्वीच शासनाने पाणंदमुक्त (ओडीएफ) म्हणून जाहीर केले आहे. तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांच्या काळात दोन वर्षांपूर्वी शासनाने ही घोषणा केली होती. परंतु, त्याच्या पुढता टप्पा म्हणजे ओडीएफ ‘अधिक’ दर्जा. त्यासाठी विद्यमान आयुक्त रमेश पवार यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. मध्यंतराच्या काळात पुन्हा एकदा उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार सुरू झाले होते. त्या कारणांचा शोध घेऊन वैयक्तिक स्वच्छतागृह पूर्ण करून घेण्याचे प्रयत्न झाले. त्यातील येणाऱ्या अडचणी दूर केल्या व आठ हजारांवर स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्याच बरोबर सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करण्याचे, तेथे पायाभूत सुविधा देण्याचे प्रयत्न केल्या जात आहेत.

‘ओडीएफ अधिक’ दर्जासाठी विशेष प्रयत्न

‘ओडीएफ अधिक’ म्हणजे शहरात रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी शौच किंवा लघवी केल्या न जाणे तसेच, शहर पाणंदमुक्त असणे तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत दिलेले वैयक्तिक स्वच्छतागृह, सार्वजनिक शौचालये सुस्थितीत कार्यान्वित असणे आदी बाबींचा समावेश होता. शहर ओडीएफ घोषीत झाल्‍यानंतर शहर ‘ओडीएफ अधिक’ करण्‍यासाठी शासनाच्या निकषानुसार कार्यवाही करून जास्‍तीत जास्‍त गुणांकन मिळविण्‍यासाठी पालिका आवश्यक त्या उपाययोजना करीत होती.
ता. एक व दोन नोव्हेंबर रोजी शासनाचे क्यूआयसी पथक शहरात आले होते. त्यांनी शहरात सर्वत्र फिरून निकषांची पडताळणी केली. शहर ‘ओडीएफ अधिक’ करण्‍यासाठीचे सर्व निकष पूर्ण केल्‍याचे पथकास निदर्शनास आले. त्यामुळे गुरुवारी शासनाने शहर ‘ओडीएफ अधिक’ घेाषीत केले आहे.

‘ओडीएफ अधिक’ दोन कडे वाटचाल
 

ओडीएफ अधिक दर्जा प्राप्त झाल्यानंतर आता ओडीएफ अधिक दोन कडे शहराची वाटचाल सुरू झाली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता झाल्यास व शहराचा हा दर्जा प्राप्त झाल्यास, केंद्र व राज्‍य शासनामार्फत विविध प्रकारच्‍या बक्षीस व अन्य स्‍वरूपातील निधी उपलब्‍ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मीना वरपुडकर, उपमहापौर माजुलाला, आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.

कोट
नागरिकांच्या सहकार्यामुळेस शहरास ओडीएफ व ओडीएफ अधिकचा दर्जा प्राप्‍त झाला आहे. यासाठी शहरातील नागरिक, संस्‍था, एनजीओ आदींचे मोठे सहकार्य मिळाले. त्यातून पालिकेस कोट्यवधींचा निधी मिळू शकतो. शासन स्तरावरदेखील पालिकेची प्रगती दिसून येत आहे. पायाभूत सुविधांसाठी विशेष निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रमेश पवार, आयुक्त, महापालिका, परभणी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This municipality is rated 'ODF more'