मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश बालयोगी काशीगिरी महाराज यांचे निधन 

सचिन चौबे 
गुरुवार, 17 मे 2018

सिल्लोड (औरंगाबाद) : मुर्डेश्वर (ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) येथील मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश बालयोगी काशीगिरी महाराज यांचे गुरूवारी (ता.17) निधन झाले. 

गुरुवारी रात्री त्यांना ह्रदयविकाराचा त्रास झाला होता. सकाळी बेशुद्ध अवस्थेत त्यांना सिल्लोड येथे सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्यावर शुक्रवारी (ता.18) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

महाराजांचा लाखोंच्या संख्येने भक्तपरिवार असून त्यांनी मुर्डेश्वर संस्थानची वेगळी ओळख निर्माण केली होती. राजकीय क्षेत्रामध्ये सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नेहमीच मुर्डेश्वर येथील मंदिरात हजेरी लावत. बाबाजी तालुक्‍यात बालयोगी नावाने ओळखळ्या जात होते. त्यांच्या अंत्यदर्शानासाठी मुर्डेश्वर येथे मोठ्याप्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: muradwshwar pithadhish balyogi kashinath maharaj expired