महाकाळा येथे वृद्ध व्यक्तीचा खून

दिलीप पवार
सोमवार, 24 जून 2019

अंकुशनगर (जि. जालना) : अंबड तालुक्यातील महाकाळा येथील एका वृद्धाच्या डोक्यात अवजड वस्तूने घाव घालून खून केल्याची घटना सोमवारी (ता. 24) पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली. माणिक जिजा मुळे (वय 55, रा. महाकाळा) असे या मयताचे नाव आहे. दरम्यान खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील राजेंद्र कव्हळे यांना सांगितले त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गोंदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सी डी शेवगण, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवानंद देवकर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह श्वाविच्छेदनासाठी वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

दरम्यान, महादेव मुळे यांचा खून घरातील व्यक्तीनेच केला असल्याची पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार पोलीस तपास करत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of aged person at Mahakal