जुन्या वादातून मित्रानेच घोटला मित्राचा गळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

बेगमपुरा ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी माहिती दिली की, अजय शत्रूघन तिडके असे खून झालेल्याचे नाव आहे. गुरुवारी पहाटे चार ते सव्वा चारच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला असून सकाळी सातला हि बाब उघडकीस आली.

औरंगाबाद : जुन्या वादातून मित्राने मित्राचा गळा घोटून निर्घृण खून केला. हि खळबळजनक घटना जयसिंगपूर येथील रामेश्वर अपार्टमेंट येथे गुरुवारी (ता. 5) पहाटे चार ते सव्वाचारच्या सुमारास घडली.

बेगमपुरा ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी माहिती दिली की, अजय शत्रूघन तिडके असे खून झालेल्याचे नाव आहे. गुरुवारी पहाटे चार ते सव्वा चारच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला असून सकाळी सातला हि बाब उघडकीस आली. हा खून मंगेश वायवळ याने केल्याचे समोर येत असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनास्थळाचा पंचनामा सुरु असून खुनाचा कसून तपास करीत असल्याचे निरीक्षक आडे यांनी सांगितले.

Web Title: murder in Aurangabad