सख्या भावाचा केला दगडाने ठेचून खून

Murder of a brother by a stone
Murder of a brother by a stone

नांदेड -  दारु पीऊन नशेत घरी आलेल्या मोठ्या भावाने त्याला घरातून बाहेर ओढून रस्त्यात ठेचून गंभीर जखमी केले होते. जखमीचा उपचारादरम्यान नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १८) रात्री बहाद्दरपूरा (ता. कंधार) घडली होती.

कंधार तालुक्यातील बहाद्दपूरा येथे राहणारा चंद्रकांत भानुदास गायकवाड (वय ३०) हा दारु पिण्याच्या सवईचा होता. तो रविवारी (ता. १८) रात्री एक वाजता दारुच्या नशेत आला. घरात आल्यानंतर वडिल व भावाला जेवण मागितले. आताच दहा वाजता जेवण करून घरुन गेला. परत आता कशाचे जेवण म्हणून त्याला धमकावले. यावेळी नशेत असलेल्या चंद्रकांतने वडिलाला व लहान भावाला शिविगाळ केली. यावेळी सचिन भानुदास गायकवाड (वय २२) याने चंद्रकांतला घरातून बाहेर ओढून काढले. रस्त्यावर नेऊन त्याच्या डोक्यात दगडाने मारून गंभीर जखमी केले. रस्त्यात पडल्याने जखमी होऊन मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र वैद्यकिय अहवालावरून त्याच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सिध्द झाले. यावरून पोलिस प्रकाश टाकरस यांच्या फिर्यादीवरुन सचिन भानुदास गायकवाड याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे हे करीत आहेत. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com