वडिलांचा खून करणाऱ्या मुलाने केली आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

जळकोट  - धोंडवाडी (ता. जळकोट) येथील मुलाने वडिलांच्या डोक्‍यात कुऱ्हाड घालून बुधवारी (ता. एक) त्यांचा खून केला होता. यानंतर मुलाने शुक्रवारी (ता. तीन) दुपारी स्वतःच निंबाच्या झाडाला गळफास घेतला. 

जळकोट  - धोंडवाडी (ता. जळकोट) येथील मुलाने वडिलांच्या डोक्‍यात कुऱ्हाड घालून बुधवारी (ता. एक) त्यांचा खून केला होता. यानंतर मुलाने शुक्रवारी (ता. तीन) दुपारी स्वतःच निंबाच्या झाडाला गळफास घेतला. 

तालुक्‍यातील धोंडवाडी येथील लक्ष्मण घुले यांचा मुलगा बालाजी व पत्नीने डोक्‍यात कुऱ्हाडीचे वार करून खून केला होता. याप्रकरणी जळकोट पोलिसांनी मृताच्या पत्नीस अटक केली होती. मुलगा मात्र फरार होता. घटनेच्या दोन दिवसांनंतर मृत लक्ष्मण घुले यांचा मुलगा बालाजी (वय 25) याने धोंडवाडी येथील स्वतःच्या घरामागील शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती शेतकऱ्यांनी जळकोट पोलिसांना दिली. 

पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला. जळकोट पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

वडिलांचा खून करून मुलगा फरार झाला होता. तिसऱ्याच दिवशी स्वतःच मुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या घटनेबाबत परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे. 

Web Title: murder case

टॅग्स