विखे पाटलांवर खुनाचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चौघांवर कुलकर्णी यांचा संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी विनंती करणाऱ्या अर्जाच्या अनुषंगाने राहता (जि. नगर) येथील न्यायालयात नोंदविण्यात आलेल्या दोन साक्षीदारांच्या साक्षी पुन्हा नोंदविण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

औरंगाबाद - केशव कुलकर्णी यांच्या मृत्यू प्रकरणात संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्याबाबत नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करण्याची मुभा औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांनी याचिकाकर्त्याला दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चौघांवर कुलकर्णी यांचा संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी विनंती करणाऱ्या अर्जाच्या अनुषंगाने राहता (जि. नगर) येथील न्यायालयात नोंदविण्यात आलेल्या दोन साक्षीदारांच्या साक्षी पुन्हा नोंदविण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. याविरुद्ध दाखल याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
Web Title: Murder Charges on Radhakrishana Vikhe Patil