प्रियकर आतेभावाच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

औरंगाबाद - सेंट्रिंगचे काम करणाऱ्या पतीचा पत्नीच्या प्रियकराने गळा आवळून खून केला. या खुनाचा उलगडा झाला असून, अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला. या प्रकरणी मृताच्या पत्नीसह प्रियकराला पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी पत्नीचा आतेभाऊच असून, दोघांच्या संबंधात पती अडसर ठरत होता.   

औरंगाबाद - सेंट्रिंगचे काम करणाऱ्या पतीचा पत्नीच्या प्रियकराने गळा आवळून खून केला. या खुनाचा उलगडा झाला असून, अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला. या प्रकरणी मृताच्या पत्नीसह प्रियकराला पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी पत्नीचा आतेभाऊच असून, दोघांच्या संबंधात पती अडसर ठरत होता.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जानू चव्हाण (वय २५, रा. धोपटेश्‍वर, ह.मु. उज्ज्वलाताई पवार शाळेजवळ, सातारा परिसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २३ जुलैला सकाळी बीड बायपास परिसरातील रेणुकामाता मंदिर परिसरात त्याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात मृताची पत्नी ज्योती संतोष चव्हाण (२३) व तिचा आतेभाऊ धर्मा प्रताप जाधव (२०, रा. गणपती राजूर, ता. भोकरदन, ह.मु. पुंडलिकनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संतोष चव्हाण हा ठेकेदार असलेल्या त्याच्याच भावाकडे सेंट्रिंग काम करीत होता. रविवारी (ता. २२) तो कामावर जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता; पण रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नव्हता. सोमवारी (ता. २३) बीड बायपासवरील रेणुकामाता मंदिर कमानीसमोरील मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह आढळला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या पथकाने केली.

असा शिजला कट
संतोष दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याचा दारूच्या नशेतच गेम वाजवायचा इरादा त्याची पत्नी व आतेभाऊ असलेल्या प्रियकराने केला होता. त्यासाठी त्यांनी रविवारचा दिवस निवडला. त्याच्यावर दिवसभर पाळत ठेवून पाठलागही केला. रात्र होताच त्याला मद्यधुंद अवस्थेत संशयिताने गाठले.

असा केला खून
पगार झाल्यानंतर त्याने काही पैसे घरी दिले व उर्वरित पैशांची दारू पिली. यानंतर तो संग्रामनगर येथील रेल्वेपटरीजवळ झोपला. हीच संधी साधून धर्माने त्याला घरी न्यायचे, मी त्याचा नातेवाईक आहे, असे इतर दोघांना सांगत त्यांची मदत घेतली. त्याला रिक्षाने बीड बायपास येथील रेणुकामाता कमानीजवळ नेले. घर जवळच आहे असे सांगून रिक्षातून काढता पाय घेत संतोषला मोकळ्या जागेत नेऊन धर्माने चाकूने गळा कापून त्याला ठार केले.

Web Title: murder crime