पैशाच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

Satta-Alim
Satta-Alim

औरंगाबाद - खरेदी केलेल्या घरावरील ताबा सोडत नाही आणि पैसेही परत करीत नसल्याच्या रागातून पुतण्याने काकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना रविवारी (ता. पाच) सायंकाळी सहाच्या सुमारास देवळाई चौकात घडली. खून करून पुतण्या फरार झाला असून, संशयिताच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके मागावर पाठवण्यात आली आहेत.

देवळाई परिसरातील व्यापारी शेख सत्तार शेख सांडू यांचे ख्वाजानगरात घर होते. ते पुतण्या शेख अलीम शेख बुढण याने खरेदी केले. त्याची इसारपावती करून काही रक्कमही त्याने दिली होती; मात्र हे घर ताब्यात देण्यास अलीमने तगादा लावूनही सत्तार टाळाटाळ करीत होता. 

यावरून दोघांत अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. रविवारी सकाळपासून अलीमने पैशासाठी तगादा लावल्याने दोघांत कडाक्‍याचे भांडण झाले. सायंकाळपर्यंत पैसे न दिल्यास परिणामाला तयार राहा, अशी अलीमने धमकी दिली होती. 

सायंकाळी देवळाई चौकातील हॉटेलात सत्तार बसलेले असताना अलीमने त्या ठिकाणी येऊन वाद घालत त्याच्या पोटात चाकू खुपसला. तीन वार केल्याने सत्तार जागीच कोसळला.

घटनेनंतर अलीमने रिक्षासह पळ काढला. नागरिकांनी सत्तारला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. 

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. फरार अलीमच्या मागावर दोन पथके पाठविण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com