का झाला जळगाव रस्त्याच्या कामावर खून? फुलंब्रीत खळबळ

नवनाथ इधाटे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

फुलंब्री येथील शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. फुलंब्री बसस्थानक परिसरात एका चिकन शॉपच्या बाजूला रविवारी (ता.आठ) रोजी युनूस बाबन पठाण (रा. टाकळी लिंबाजी, ता. कन्नड) या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

फुलंब्री (जि. औरंगाबाद) : येथील बसस्थानकाजवळ मुख्य महामार्गाच्या बाजूला एका तीसवर्षीय व्यक्तीचा मृतदेह रविवारी (ता.आठ) सकाळी आढळून आला. धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्राने दिली. युनूस बाबर पठाण (वय 30, रा. टाकळी-चिंचोली, ता. कन्नड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  

बसस्थानकाजवळील एक चिकन शॉपच्या बाजूला एका तीसवर्षीय व्यक्तीचा मृतदेह रविवारी सकाळी काही नागरिकांना आढळून आला. सकाळी मुख्य बाजार महामार्गावरील दुकानदार आपापली दुकाने उघडत असताना सदर मृतदेह दुकानदारांना दिसला. प्रथम फुलंब्री पोलिसांना याची माहिती देण्यात आली. फौजदार श्री. कांबळे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले.

बाप रे - या रुग्णांचे घाटीत अर्धशतक

महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेद्वारे सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. सदर घटनेची माहिती पोलिसांनी वरिष्ठांना दिल्यानंतर उपविभागिय पोलिस अधिकारी विशाल नेहूल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या पथकांनी घटनास्थळ परिसरातील काही दुकानदारांना विश्वासात घेऊन रात्री सदर व्यक्ती किती वाजता फिरताना आढळून आली, त्यानंतर कोणत्या दुकानवर जाऊन दारू पिली, त्याच्यासोबत कोण कोण होते, आदी माहिती दिवसभर घेतली. त्यानंतर चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले. 

पैशांवरून खुनाचा संशय 

युनूस हा शनिवारी सकाळी शेळ्या खरेदी करण्यासाठी घरून आला होता. त्याच्याकडे आठ ते दहा हजार रुपये होते, असे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. तो फुलंब्रीत आल्यानंतर बस्थानकालगतच्या दारू दुकानावर दारू पिला. नंतर याच परिसरात त्याच्या खिशातील पैसे कोणीतरी काढून घेत, धारदार शस्त्राने त्याच्या पोटात मारून गंभीर जखमी केले असावे. त्याच अवस्थेत त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - सेक्ससाठी तीन हजार रेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder on Jalgaon Road Work Near Phulambri in Aurangabad District