नांदेड : पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाचा खून

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 19 जून 2019

पोलिसांनी तत्परता दाखवत मारेकऱ्यांना अटक केली. छत्रपती चौक परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनी मध्ये राहणारे संदीप सदावर्ते वय 24 आणि संजय कापुरे वय 45 या दोघांमध्ये पैसे देण्याघेण्याचा व्यवहार होता. यातून संदीप सदावर्ते यांनी पैसे घेतले होते त्यापैकी काही पैसे त्याने दिले.

नांदेड : पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाने चाकूने भोसकून आपल्या मित्राचा निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास छत्रपती चौक परिसरात घडली.

पोलिसांनी तत्परता दाखवत मारेकऱ्यांना अटक केली. छत्रपती चौक परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनी मध्ये राहणारे संदीप सदावर्ते वय 24 आणि संजय कापुरे वय 45 या दोघांमध्ये पैसे देण्याघेण्याचा व्यवहार होता. यातून संदीप सदावर्ते यांनी पैसे घेतले होते त्यापैकी काही पैसे त्याने दिले. परंतु दहा हजार रुपये देण्यास त्याला विलंब लागू लागला. अखेर मंगळवारी रात्री संजय कापूरे याने त्याच्याशी वाद घातला आणि चाकूने भोसकून त्याचा खून केला.

घटनास्थळी भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे हे आपल्या सहकार्‍यांसह काही वेळेच्या आत पोहचले. जखमीला येथील खाजगी रुग्णालयात व त्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान संदीप सदावर्ते यांचा मृत्यू झाला. तर इकडे मारेकरी संजय कपूर याला अटक केली. भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in Nanded