दारू पिण्याच्या कारणावरून वृ्द्धाचा जमिनीत तोंड दाबून खून

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 6 जून 2019

दारु पिण्याच्या कारणावरून वाद होऊन एका वृध्दाचे तोंड जमिनीत दाबुन धरून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून मृतदेह काटेरी झूडुपात टाकल्याची घटना बुधवारी (ता. 05) रात्री धनेगाव परिसरात उघडकीस आली.
 

नांदेड : दारु पिण्याच्या कारणावरून वाद होऊन एका वृध्दाचे तोंड जमिनीत दाबुन धरून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून मृतदेह काटेरी झूडुपात टाकल्याची घटना बुधवारी (ता. 05) रात्री धनेगाव परिसरात उघडकीस आली.
 

आरोपीला पोलिस कोठडी
शहरापासून अगदी लागुनच असलेल्या वाजेगाव (ता. नांदेड) येथील मिलींदनगर भागात राहणारे सखाराम हरी पाईकराव (वय 70) आणि अशोक सटवा पोटफोडे (वय 40) हे दोघे वाजेगाव येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानावर बुधवारी (ता. 05) दुपारी दारु पिण्यासाठी गेले. दारु पिण्याच्या कारणावरून या दोघांत चांगलाच वाद झाला. वादाचा राग अनावर न झाल्याने अशोक पोटफोडे यांनी वृध्द असलेल्या सखाराम पाईकराव यांना जबर मारहाण केली. त्यांचे तोंड जमिनीत दाबुन त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सदरचा मृतदेह धनेगाव शिवारातील एका काटेरी झुडुपात फेकून देऊन पसार झाला.

शोधाशोध केली असता धनेगावच्या झुडूपात मृतदेह आढळून आला. ही माहिती नांदेड ग्रामिण पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दयानंद पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पंचनामा करून खूनाचा धागादोरा तपासला. दरम्यान मयताचा मुलगा ट्रक चालक गंगाधर सखाराम पाईकराव यांच्या फिर्यादीवरुन घराशेजारी राहणारा अशोक सटवा पोटफोडे याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला.

पीआय पाटील यांनी गुप्त माहितीवरुन आरोपी अशोक पोटफोडे याला गुरूवारी (ता. सहा) पहाटे वाजेगावातून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडीत पाठविणयात आले आहे. तपास एपीआय दयानंद पाटील हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in nanded due to drinking alcohol