esakal | पैशावरूनच झाला विद्यार्थ्याचा खून

बोलून बातमी शोधा

file photo}

सासऱ्याला दिलेल्या पैशावरून असलेला वाद व पत्नीला सासरी पाठविण्यास दिलेला नकार यामधून पंधरा वर्षीय मेव्हण्याचे अपहरण व त्यानंतर झालेल्या झटापटीत त्याचा खून झाल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी दिली. लासीना येथील संतोष डांगे (वय १५) या विद्यार्थ्याचे कळमनुरी येथून सोमवार (ता.दोन) अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता.

पैशावरूनच झाला विद्यार्थ्याचा खून
sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली): तालुक्यातील लासीना येथून विद्यार्थी संतोष डांगे (वय १५) हा शिक्षणासाठी कळमनुरी येथे दररोज येत होता. सोमवारी (ता.दोन) कळमनुरी येथून त्याचे अपहरण झाले होते. मंगळवारी (ता.तीन) अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह भांबरखेडा ता. पुसद येथे केबल टाकण्याच्या खड्ड्यात अर्धवट अवस्थेत पुरलेला आढळून आला होता. या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून खूनी मयत विद्यार्थ्याचा भाऊजी निघाला. त्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.  

हेही वाचा :   चक्क कडूलिंबावरच ‘अळी’चा प्रादुर्भाव !

कळमनुरी तालुक्यातील लासीना येथून विद्यार्थी संतोष डांगे (वय १५) हा शिक्षणासाठी कळमनुरी येथे दररोज येत होता. सोमवारी (ता.दोन) कळमनुरी येथून त्याचे अपहरण झाले होते. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात विद्यार्थ्याचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (ता.तीन) भांबरखेडा ता. पुसद येथे केबल टाकण्याच्या खड्ड्यात अर्धवट अवस्थेत पुरलेला एक मृतदेह आढळून आला होता. 

दोघांना अटक
 

हा मृतदेह संतोष डांगे याचा असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. कळमनुरी पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. या वेळी तातेराव सूर्यवंशी (रा.मोरवाडी ता. कळमनुरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या माहितीवरून त्याचा भाऊ कैलास सूर्यवंशी यालाही ताब्यात घेण्यात आले.  याप्रकरणी तातेराव सूर्यवंशी व कैलास सूर्यवंशी यांना न्यालयालयासमोर उभे केले असता प्रथम पाच दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

 त्यानंतर दुसऱ्यांदा तीन दिवसाची व तिसऱ्या वेळेस दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवार(ता.१४) दोघांनाही  न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचा :  नांदेडचा व्यावसायिक पोहोचला सातासमुद्रापार

पत्नीला सासरी पाठविण्यास नकार

या प्रकरणातील तातेराव सूर्यवंशी याने या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. विशेष म्हणजे तातेराव हा मयत संतोष डांगे याचा भाऊजी आहे. तातेराव सूर्यवंशी याने सासऱ्याला पैसे दिले होते. ते पैसे परत मिळत नव्हते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. या कारणावरून सासरच्या मंडळीने तातेरावच्या पत्नीला दिवाळीला माहेरी नेले. परंतु, दिवाळी झाल्यानंतर तिला सासरी पाठवण्यास नकार देण्यात आला. पत्नीला सासरी आणावे याकरिता पत्नीचा लहान भाऊ संतोष डांगे अपहरण केले. पत्नी माहेरी आली म्हणजे संतोषला सोडून देता येईल, असा बेत होता.

मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला

 मात्र ताब्यात घेतलेल्या संतोष डांगे याने याला प्रकाराची कल्पना आल्यानंतर आरडाओरड सुरू केली. त्याची आरडाओरड थांबवण्याचे हेतूने त्याचे तोंड दाबले. या झटापटीत त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घाबरलेल्या आरोपीने त्याला केबल टाकण्याच्या खड्ड्यात पुरण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री. भोईटे यांनी दिली.