जास्त लाड होत असल्याने जुळ्या भावाचा खून, झोपेतच घातला हातोडा 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - तो हुशार आहे. त्याचेच घरात लाड केले जातात. या न्यूनगंडातून वयाने केवळ पाच मिनिटे मोठा असलेल्या जुळ्या भावाचा डोक्‍यात हातोडा घालून खून केला. आई लग्नाला गेली आणि भाऊ झोपलाय, हे पाहून लहान्याने हा घात केला. हा खळबळजनक प्रकार शहरातील कैलासनगर येथे मंगळवारी (ता. 26) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. विशेष म्हणजे दोघेही भाऊ पंधरा वर्षांचे आहेत. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अरुण (नाव बदलले, वय 15, रा. कैलासनगर) असे मृताचे नाव आहे. खाराकुंआ भागातील एका हायस्कूलमध्ये तो दहावीत शिक्षण घेत होता. अरुण हा त्याच्या जुळ्या भावापेक्षा पाच मिनिटांनी मोठा होता. दहा वर्षांपूर्वी रिक्षाचालक असलेल्या त्याच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांची आई वृत्तपत्र विकून उदरनिर्वाह भागवत होती. दोघा भावात कधीही आपसात भांडण झाले नव्हते; परंतु अरुण हा अतिशय हुशार होता. त्यामुळे त्याचा घरातील सदस्य व शिक्षकही लाड पुरवायचे ही बाब लहान भावाला सतत बोचायची. यातून त्याच्यात न्यूनगंड वाढत गेला आणि शेवटी त्याच्या हातून मोठ्या भावाचा खून झाला. या घटनेची नोंद जिन्सी पोलिस ठाण्यात करण्यात आली. 
 
याच महिन्यात झाला वाढदिवस 
जुळे असलेल्या दोघा भावंडांचा 10 फेब्रुवारीला वाढदिवस साजरा झाला. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांची आई लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेली होती. मंगळवारी दुपारी दोघांनी नळाचे पाणी भरले. त्यानंतर अरुण पलंगावर झोपला. हे पाहून लहान भावाने त्याच्या डोक्‍यात हातोड्याने सपासप वार केले. यात अरुण गतप्राण झाला. 
-- 
घरात रक्ताचा सडा 
अरुणच्या खुनानंतर पलंगावर तसेच आजूबाजूला रक्ताचा सडा होता. दरवाजा अर्धवट उघडा होता. घटनास्थळी निरीक्षक श्‍यामसुंदर वसूरकर, सहायक निरीक्षक शरद जोगदंड, गुन्हे शाखेचे अधिकारी अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी घरात पाहणी केली. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने पुरावे गोळा केले. 
 
पोलिसांनी घेतले ताब्यात 
ज्यावेळी अरुणवर एक वार लहान्या भावाने केला. त्यानंतर तो झोपेतून उठून उलट वार करेल, अशी भीती त्याला वाटली. त्यामुळे त्याने अरुणच्या डोक्‍यात वारंवार वार केले. यानंतर एका क्‍लासेसच्या दिशेने लहान्यान धूम ठोकली. घटनेची माहिती समजताच नागरिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर जिन्सी पोलिसांनी विचारपूससाठी लहान्याला ताब्यात घेतले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com