
Marathwada Flood
Sakal
मुरूम : या परिसरात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले असून उमरगा तालुक्यातील मुरुम शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान तर झालेच. परंतु वाहतुकीसह जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुरुम मंडळातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेत शिवारातील माती वाहून गेली.