तडफडणाऱ्या वासराला वाचवण्यासाठी चिमुकल्यांनी केली धडपड, पण... 

मंगेश यादव
Wednesday, 15 January 2020

मदरशातून कुराण पठण करून निघालेल्या चिमुकल्य़ांवा रस्त्यावर तडफडणारे वासरू नजरेस पडले. त्यांनी आपल्या जवळच्या बाटलीतले पाणी त्याला पाजण्याचा प्रयत्न केला. 

कळंब (उस्मानाबाद) : लहान मुले खरी निरागस आणि संवेदनशील असतात. त्यांच्यात करुणा ओतप्रोत भरलेली असते. त्याचेच उदाहरण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या तालुक्याच्या शहरात पाहायला मिळाले.

मदरशातून कुराण पठण करून निघालेल्या चिमुकल्य़ांवा रस्त्यावर तडफडणारे वासरू नजरेस पडले. त्यांनी आपल्या जवळच्या बाटलीतले पाणी त्याला पाजण्याचा प्रयत्न केला. 

शहरातील भाजी मार्केट आगर असलेल्या मरकस मस्जीदमधून सायंकाळच्या वेळी काही बालके कुराण शरीफचे पठण करून घराकडे निघाली होती. वाटेत त्यांना एक गाईचे वासरू व्याकूळ अवस्थेत तडफडत पडलेले दिसून आले. त्यावर काय करावे ते त्यांना उमजेना.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचा खर्च किती?

आपल्या बुद्धीप्रमाणे त्यांनी लागलीच जवळची बाटली काढून वासराला पाणी पाजून त्याचा जीव वाचवण्याची धडपड केली. तोवर सगळे चिमुकले तिथेच थांबून राहिले. मकर संक्रांतीच्या सणाला घराबाहेर पडलेल्या महिलादेखील त्या बालकांचे हे सत्कृत्य पाहून थक्क झाल्या. 

दुर्दैवाने ते वासरू फार काळ जगू शकले नाही. 

एकीकडे  गोहत्याबंदी कायद्यावरून व्यक्त होणारी उलटसुलट मते, आंदोलने आणि त्यावरून झालेल्या हत्यांच्या बातम्या आपल्या कानी येत असताना, कळंबच्या या चिमुकल्या मुस्लिम बालकांनी भूतदया काय असते, याचा जणू धडाच दिला आहे. 

सफा रियाज शेख, अलिजा रफीक शेख, हुजेफा रफीक शेख, अरमान रफीक शेख, फिरदोस इस्माईल शेख, आयेशा इस्माईल शेख, अफरोज इस्माईल शेख, शोहेब बागवान, सईद इसाक शेख, नवाज सद्दाम पठाण व जैद यासीन अशी या बालकांची नावे आहेत.

काय होतं यंदाच्या साहित्य संमेलनाचं वेगळेपण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim Children Tried To Save A Calf Kalamb Osmanabad News