फुलंब्री - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात एक वेगळीच झलक पाहायला मिळाली. हजारोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले असताना मुस्लिम समाजाचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. मोर्चात 'मुस्लिम मावळा' असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आणि उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.