esakal | आवाजाचे गुढ उकलेना, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा हादरे... 

बोलून बातमी शोधा

unnamed

हिंगोली जिल्ह्याला मागील पंधरा दिवसांपासून ‘कोरोना’बाधितांचे रुग्ण वाढत असल्याचे हादरे बसत आहेत. यातून जिल्हावासीय सावरतो न तोच पुन्हा एकदा मंगळवारी रात्री काही तालुक्यातील गावांमध्ये दोनदा गुढ आवाज आले. यात हिंगोलीसह वसमत व कळमनुरी तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा हादरे बसले आहेत.  

आवाजाचे गुढ उकलेना, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा हादरे... 
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली ः हिंगोलीसह वसमत व कळमनुरी तालुक्यातील काही गावांत मंगळवारी (ता.१२) रात्री साडेनऊ वाजता जमिनीतून एकापाठोपाठ एक दोन आवाज आले. या आवाजाने नागरिक रस्त्यावर आले. सतत होत असलेल्या या आवाजाने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोली जिल्ह्याला मागील पंधरा दिवसांपासून ‘कोरोना’बाधितांचे रुग्ण वाढत असल्याचे हादरे बसत आहेत. यातून जिल्हावासीय सावरतो न तोच पुन्हा एकदा मंगळवारी रात्री काही तालुक्यातील गावांमध्ये दोनदा गुढ आवाज आले. यामुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा हादरे बसले आहेत.

या गावांमध्ये आवाज 
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रात्री साडेनऊ वाजता जमिनीतून गूढ आवाज आला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे दोन आवाज आले. हे आवाज पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, सिरळी, खापरखेडा आदी गावात आले. तसेच कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी, जांब, बोल्डा आदी गावात आले आहेत. या आवाजाने गावकरी घराच्या बाहेर आले. आवाजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - हिंगोलीत १८ जवानांनी जिंकले ‘कोरोना युद्ध’

गुढ आवाजाची मालिका सुरू                                                    
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे मागच्या काही वर्षांपासून गुढ आवाजाची मालिका सुरू आहे. मात्र त्याचे गुढ उकलले नाही. या गावात आवाज आल्यावर वसमत तालुक्यासह औढा व कळमनुरी गावातील अनेक गावात हा आवाज येत आहेत. 

हेही वाचा - गावी परतल्याच्या आनंदाने मजूर गहिवरले... 

आवाजाचे गुढ उकलावे अशी मागणी
या बाबत गावकऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला वारंवार कळविले आहे. एक मागच्या दोन वर्षापुर्वी येथे स्वारातीम विद्यापीठातील टिमने भेट देऊन पाहणी केली. मात्र, आवाजाच्या गुढबद्दल काही सांगितले नाही. आता प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवाजाचे गुढ उकलावे, अशी मागणी या गावातील गावकऱ्यांतून होत आहे. दरम्यान सलग दोन आवाजाने गावकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत. दरम्यान, गावकरी नेहमीच तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडे याबाबी वारंवार सांगत आहे. तरीदेखील पाहणी केल्यानंतर प्रशासन आश्‍वासन देते. पुन्हा आवाजाची मालिका सुरुच राहते. या आवाजाने गावकरी घराच्या बाहेर आले. आवाजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.