नाबार्डचा 4110 कोटींचा कर्ज आराखडा बीडला तयार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

बीड : नाबार्डचा 2017 - 18 या आर्थिक वर्षाचा 4110 कोटी रुपयांचा कर्ज आराखडा तयार केला असून यामध्ये कृषी कर्जासाठी 2268 कोटी रुपये, तर कृषी पूरक व्यवसायासाठी 327 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

बीड : नाबार्डचा 2017 - 18 या आर्थिक वर्षाचा 4110 कोटी रुपयांचा कर्ज आराखडा तयार केला असून यामध्ये कृषी कर्जासाठी 2268 कोटी रुपये, तर कृषी पूरक व्यवसायासाठी 327 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

या कर्ज आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन मंगळवारी (ता.28) अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक एन. डी. पवार, अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक विजय चव्हाण, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे क्षेत्रिय व्यवस्थापक आबासाहेब मुळे, हैदराबाद बॅंकेचे क्षेत्रिय व्यवस्थापक दीपक कुमार उपस्थित होते. या कृषी कर्ज आराखड्यामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास होईल, अशी आशा एन. डी. पवार यांनी व्यक्त केली.

Web Title: NABARD to submit loan proposal