बछड्यांच्या नामकरणाचा रंगला सोहळा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

औरंगाबाद : फुग्यांनी सजविलेला मंडप, उपस्थितांचा प्रचंड उत्साह व बुंदी लाडूचे वाटप करत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील चार बछड्यांचे शनिवारी (ता. 8) नामकरण करण्यात आले. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार बछड्यांना कुश, अर्पिता, देविका, प्रगती अशी नावे देण्यात आली. 

सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील समृद्धी या वाघिणीने 25 एप्रिलला चार बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्यांच्या नामकरण सोहळ्याचे शनिवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्राणिसंग्रहालयात कालपासूनच आनंददायी वातावरण होते. सर्वत्र फुगे लावून व्यासपीठ सजविण्यात आले. उपस्थितांनी टाळ्या वाजवत पाळणा म्हटला व चार बछड्यांचा नामकरण विधी पार पडला. बछड्यांची नावे सुचविण्यासाठी महापालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. सुमारे दीड हजार नावे नागरिकांनी सुचविली होती. त्यातील 40 नावे अंतिम करण्यात आली. ड्रॉ पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून एक नर व चार मादी बछड्यांना नावे देण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naming ceremony of cubs at Aurangabad