लातूर, नांदेडला नीट परीक्षा केंद्र मिळण्यासाठी आग्रह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

लातूर -वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात सात मे रोजी नॅशनल इलिजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नांदेड व लातूर येथे केंद्र देण्याची मागणी आहे. त्यासाठी मराठवाड्यातील खासदार व आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. नीट परीक्षेसाठी मराठवाड्यात फक्त औरंगाबाद येथेच केंद्र देण्यात आले आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह लातूर व नांदेडला नीटचे परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे.

लातूर -वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात सात मे रोजी नॅशनल इलिजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नांदेड व लातूर येथे केंद्र देण्याची मागणी आहे. त्यासाठी मराठवाड्यातील खासदार व आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. नीट परीक्षेसाठी मराठवाड्यात फक्त औरंगाबाद येथेच केंद्र देण्यात आले आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह लातूर व नांदेडला नीटचे परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे. नीट परीक्षेसाठी देशभरात नवीन 23 परीक्षा केंद्रे देण्याचा निर्णय होऊनही मराठवाड्याच्या वाट्याला एकही नवीन केंद्र आले नाही. या संदर्भात आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून श्री. जावडेकर यांच्याकडे नांदेड व लातूरला नीट परीक्षेसाठी केंद्रासाठी शिफारस करण्याची विनंती केली. राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील व आमदार अमरसिंह पंडित उपस्थित होते. 

डॉ. गायकवाड यांचे प्रयत्न 
लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन मराठवाड्यात लातूर व नांदेड येथे "नीट' परीक्षेची केंद्रे वाढवून देण्याची मागणी केली. हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनीही "नीट' परीक्षा 

केंद्राचा आग्रह धरला. या संदर्भात श्री. जावडेकर सकारात्मक प्रतिसाद देतील व "नीट' परीक्षा केंद्राचा प्रश्‍न निकाली निघेल, असा दावा खासदार गायकवाड यांनी केला आहे. 

पाचशे किलोमीटरचा प्रवास 
"नीट' परीक्षेसाठी मराठवाड्यात औरंगाबाद हे एकमेव केंद्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा ते औरंगाबाद किंवा नांदेड जिल्ह्यातील किनवट ते औरंगाबाद हे अंतर जवळपास 500 किलोमीटर आहे. परिणामी "नीट'च्या विद्यार्थ्यांना हा प्रवास करून परीक्षा द्यावी लागेल. विद्यार्थ्यांसोबत पालक येतील. त्यांचा प्रवास व लॉजिंग आदींचा आठ ते दहा हजारांचा खर्च, तसेच परीक्षेत येणारा ताण पाहता विद्यार्थी व पालकांचे नुकसान होणार आहे. परिणामी मराठवाड्यातील पालकांत नाराजी आहे, असे आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. 

Web Title: Nanded and Latur in demand for the NEET exam center