पैशाचे सोडा हो... दारू भेटतेना बस्स झालं

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

भोकर शहरात ग्राहकांची लुट; दारू विक्रेते मालामाल

भोकर (नांदेड)  शासनाने नुकतेच राष्ट्रीय महामार्गावर सर्व दारू विक्रीची दुकाने बंद केली आहेत. या मुळे मदिराशौकिनांची कोंडी झाली. व्यसनाच्या आहारी गेलेले ग्राहक पैसे कितीही घ्या, पण दारू द्या, अशी भूमिका घेतल्याने या संधीचे सोने करण्यासाठी दारू दुकानदारांनी चढ्या भावाने मागील दारातून विक्री सुरू केली आहे. दिवसाढवळ्या ग्राहकांची आर्थिक लुट होत आहे. संबंधित राज्य उत्पादन शुल्क व पोलिस मात्र, बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघात केवळ दारू पिण्यामुळे होतात, असे स्पष्ट झाल्याने या मार्गावरील सर्व देशी, विदेशी बिअरबार दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला व सर्व दुकाने रस्त्यापासून पाचशे मीटर दूर न्यावेत, असे आदेश काढल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून थाटलेली दुकाने आता केवळ खंडर झालीत. दुकानदार अडचणीत आहेत. काही शहरात राष्ट्रीय महामार्ग रस्ता हा पालिकेकडे हस्तांतरित करून अडथळे दूर केली आहेत.

गल्लीबोळात दारू आता सहज भेटत आहे. बसस्थानक, आंबेडकर चौक, रेल्वेगेट, मुदखेड रस्ता, किनवट रस्ता, म्हैसा रस्ता यासह अन्य ठिकाणी दारू विक्री सुरू आहे. ग्रामीण भागातील देशी दारूची दुकाने सुरू आहेत. दिवशी, किनी, पाळज येथून मोठ्या प्रमाणात दारू पार्सल केली जात आहे. विनापरवाना दारू विक्रीचा व्यवसाय तेजीत असून, ग्राहकांची आर्थिक लुट करून व्यापारी मालामाल होत आहेत. हा सर्व प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलिसांसमाेर हाेत आहे. पण अद्याप एकाही आरोपीविरुद्ध कार्यवाही करण्याचे धाडस होत नाही.

भोकर तालुका राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी या विभागाचे निरीक्षक ए. एम. पठाण यांच्याकडे सोपवली आहे. याबाबत त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, शासनाने राज्य महामार्गावरील सर्व दारू दुकाने बंद केल्याने त्या दुकानास आम्ही कुलुप ठोकले आहे. त्यांना व्यवसाय करता येत नाही, जर असा प्रकार झाला तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश आमच्या वरिष्ठांनी दिले आहेत. तसे आमचे प्रयत्न चालू आहेत.

Web Title: nanded: bhokar city and wine