नांदेड-बेंगलोर रेल्वेचे इंजिन परळीजवळ पडले बंद 

नांदेड-बेंगलोर रेल्वेचे इंजिन परळीजवळ पडले बंद 

परळी वैजनाथ, ता. 27 (बातमीदार) : येथील रेल्वेस्थानकात सकाळी नियोजित वेळेत नांदेड-बेंगलोर ही गाडी परळी स्थानकात आली. परळी स्थानकातून घाटनांदूरकडे 10 किलोमीटर अंतरावर पोचतात रेल्वे इंजिन बिघडले. दहा किलोमीटरवरून बंद ही रेल्वे परत परळी रेल्वेस्थानकात आणली. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ येथे अडकून बसावे लागल्याने त्यांची गैरसोय निर्माण झाली. 

मंगळवारी (ता. 27) सकाळी साडेआठच्या सुमारास नांदेड-बेंगलोर ही रेल्वे नियोजित वेळेत परळी रेल्वेस्थानकात पोचली. येथील स्थानकातून नऊच्या सुमारास बेंगलोरकडे रवाना झाली; पण 10 किलोमीटरवर जाताच या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. चालकाने ती रेल्वे परळी स्थानकात परत आणली, ही रेल्वे परत का आणली जात आहे, हे रेल्वेतील प्रवाशांना कळत नव्हते. प्रवाशांमध्ये यामुळे घबराट निर्माण झाली.

रेल्वेस्थानकात आल्यावर ही गाडी बंद इंजिनामुळे परत स्थानकात आणल्याचे प्रवाशांना समजले. दुसरे इंजिन या स्थानकात येईपर्यंत जवळपास दोन ते अडीच तास प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. यामुळे अनेक प्रवाशांची वेळेवर पोचण्याची गैरसोय झाली. पुढे संपूर्ण घाट असल्याने बरे झाले, येथेच इंजिन बिघडले, घाटात बिघडले असते तर मोठा अनुचित प्रकार घडला असता, आमचे नशीब चांगले, अशा प्रतिक्रिया यावेळी रेल्वेतील प्रवाशांनी व्यक्त केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com