नांदेड-चंदीगड विमानसेवा उद्यापासून सुरू   

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 7 जानेवारी 2019

नांदेड : एअर इंडियाच्या वतीने नांदेड ते चंदीगड विमान सेवेचा शुभारभ होणार आहे. येथील सिख संगत व अन्य भाविकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. मंगळवारी 8 जानेवारी रोजी या सेवेचा शुभारंभ होणार असून विमान प्रवासी बुकिंग पूर्ण झाली आहे. अशी माहिती नांदेड विमानतळ स्टेशन प्रबंधक गजेंद्र गुटे यांनी सकाळशी बोलताना दिली.                            

नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा आहे पवित्र स्थळ शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाते. याठिकाणी दर्शनासाठी लाखो बांधव देश-विदेशातून येत असतात. त्यांना प्रवासात अडचण येऊ नये व कमी वेळात दर्शन करता येईल यासाठी एअर इंडियाच्या वतीने नांदेड चंदिगड असी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा उद्या शुभारंभ होणार आहे. एअर इंडियाचे कमरशियल डायरेक्टर ओबेराय यांची यावेळी उपस्थिती राहणार असून सचखंड गुरुद्वाराचे प्रशासकीय अधिकारी सरदार डी.पी. सिंघ, अधीक्षक सरदार वाधवा, महापौर शिला भवरे यांची उपस्थिती राहणार आहे. चंदिगड येथून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाला निघणार आहे. ते साडेअकरा वाजता गुरु गोविंदसिग विमानतळ नांदेड येथे आगमन होणार आहे.

येणाऱ्या विमानसाठी 160 प्रवाशांची बुकिंग झाली आहे. तर जाण्यासाठी 130 प्रवाशांची बुकिंग झाली आहे. विमान परत चंदिगडसाठी दुपारी बारा वाजून पाच मिनिटाला उड्डाण घेऊन ते चंदीगड विमानतळावर दुपारी दोन वाजून वीस मिनिटाला पोहचणार आहे. आठवड्यातील मंगळवार व बुधवारी दोन दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे यापूर्वी नांदेड ते अमृतसर, नांदेड ते दिल्ली विमानसेवा इंडियाच्या वतीने सुरू आहे. नांदेड शहर सध्या विमानसेवेने हैदराबाद, मुंबई, दिल्ली, अमृतसर आणि आता चंदीगडला जोडण्यात आले आहे. या विमान सेवेचा भाविकांनी व अन्य प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एअर इंडियाचे गजेंद्र कुटे यांनी केले आहे.

Web Title: Nanded Chandigarh air India flight will starts from tomorrow