नांदेड ते चंदीगड विमानसेवा सुरू

नांदेड ते चंदीगड विमानसेवा सुरू

नांदेड : एअर इंडियाच्या वतीने नांदेड ते चंदीगड विमान सेवेचा शुभारंभ मंगळवारी (ता. आठ) सकाळी अकरा वाजता करण्यात आला. चंदीगडहून आलेल्या विमानाचे व प्रवाशांचे सचखंड गुरूद्वाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी एअर इंडियाचे कमरशियअल डायरेक्टर ओबेराय यांनी नांदेडच्या महापौर शिला भवरे यांना पहिले बोर्डींग पास दिले. 

नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा आहे पवित्र स्थळ शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाते. याठिकाणी दर्शनासाठी लाखो बांधव देश-विदेशातून येत असतात. त्यांना प्रवासात अडचण येऊ नये व कमी वेळात दर्शन करता येईल यासाठी एअर इंडियाच्या वतीने नांदेड चंदिगड असी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा मंगळवारी (ता. आठ) शुभारंभ करण्यात आला. चंदीगडहून आलेल्या विमानात 162 प्रवाशी होते तर चंदीगडला 157 प्रवाशी गेले. विशेष म्हणजे पहिल्या विमानाने महापालिकेच्या महापौर व नगरसेवक मनाली येथे सहलीवर गेले. सचखंड गुरुद्वाराचे अध्यक्ष आमदार तारासिंग, प्रशासकीय अधिकारी सरदार डी.पी. सिंघ, अधीक्षक सरदार वाधवा, स्टेशन मॅनेजर गजेंद्र गुटे, विमानतळ निदेशक श्रीकांत पद्मे, रविंद्रसिंग बुंगई, अॅड. अमरीकसिंग वासरीकर, औरंगाबाद विमानतळ व्यवस्थापक अजय भोळे, रणजीतसिंग कामठेकर, भागींद्रसिंग घडीसाज यांनी केक कापून या विमानसेवेचा शुभारंभ केला.

या विमानाचे सकाळी साडेअकरा वाजता गुरु गोविंदसिंग विमानतळावर आगमन झाले. विमानाने परत चंदिगडकडे दुपारी बारा वाजून पाच मिनिटाला उड्डाण घेतले. आठवड्यातील मंगळवार व बुधवारी दोन दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे. यापूर्वी नांदेड ते अमृतसर, नांदेड ते दिल्ली विमानसेवा एअर इंडियाच्या वतीने सुरू आहे. नांदेड शहर सध्या विमानसेवेने हैदराबाद, मुंबई, दिल्ली, अमृतसर आणि आता चंदीगडला जोडण्यात आले आहे. या विमान सेवेचा भाविकांनी व अन्य प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एअर इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com