Nanded: उपमहापौर, सभापतीपदासाठी अनेकजण इच्छुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Municipal Corporation
उपमहापौर, सभापतीपदासाठी अनेकजण इच्छुक

नांदेड : उपमहापौर, सभापतीपदासाठी अनेकजण इच्छुक

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेची आक्टोंबर २०२३ मध्ये सार्वत्रिक निवडणुक होत आहे. त्या दृष्टीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आत्तापासूनच रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडीत पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरींगचा फॉर्म्युला वापरला असून त्या नुसार निवडी केल्या आहेत. आता उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता आहे. जंबो बहुमत मिळाल्यामुळे पाच वर्षात चार महापौर आणि चार उपमहापौर करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार शेवटच्या टप्‍प्यात महापौरपदी जयश्री निलेश पावडे यांची वर्णी लागली. त्यानंतर सभागृह नेतेपदी ॲड. महेश कनकदंडे यांची निवड करण्यात आली. उपमहापौर मसूद खान यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे स्थायी समितीच्या आठ नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता नवीन उपमहापौर आणि नवीन स्थायी समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: Farm Bills: 'तो अहवाल सार्वजनिक करा'; अनिल घनवट यांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

उपमहापौर पदासाठी अनेकजण इच्छुक असून त्यामध्ये अब्दुल गफार यांच्यासह अब्दुल फहीम, अब्दुल लतीफ आणि फारूख बदवेल यांची नावे चर्चेत आहेत. स्थायी समितीच्या नवीन आठ सदस्यांची निवड झाली असून स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांचा कार्यकाळही ता. एक डिसेंबर रोजी संपणार आहे. सभापतीपदासाठीही विद्यमान सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांच्यासह किशोर स्वामी, अब्दुल हफीज आदी इच्छुक आहेत. त्यामुळे आता सभापती आणि उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यासाठी प्रस्तावही औरंगाबादच्या विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांनी दिली.

अशोक चव्हाण अशोक चव्हाण घेणार निर्णय नुकत्याच झालेल्या देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचे जितेश अंतापूरकर ४१ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात कॉँग्रेसचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. श्री. चव्हाण यांनी सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून सुक्ष्म नियोजन करत विजयश्री खेचून आणली आहे. महापालिकेतही हाच फॉर्म्युला वापरून त्यांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता उपमहापौर आणि सभापती कोण होणार? याचा अंतिम निर्णयही श्री. चव्हाण हेच घेणार आहेत.

loading image
go to top