esakal | संचारबंदीत नांदेड गोळीबाराने हादरले, एक ठार, दोन गंभीर.
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शहराच्या खुदबेनगर, देगलूरनाका परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास घडली. शहरात संचारबंदी असल्याने जखमीवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने पोलिसांची व नातेवाईकांची चांगलीच दमछाक उडाली. 

संचारबंदीत नांदेड गोळीबाराने हादरले, एक ठार, दोन गंभीर.

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : संपत्तीच्या वादातून दोन सख्या चुलतभावात झालेल्या हाणामारीत चक्क गोळीबार करण्यात आला. यात एकजण ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शहराच्या खुदबेनगर, देगलूरनाका परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास घडली. शहरात संचारबंदी असल्याने जखमीवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने पोलिसांची व नातेवाईकांची चांगलीच दमछाक उडाली. 

शहरात संचारबंदी असल्याने सर्वत्र स्मशान शांतता होती. परंतु देगलूर नाका भागात खुदबेनगर परिसरात झालेल्या गोळीबाराने नांदेड शहर दणाणले. आणि एकच गोंधळ उडाला. पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, खुदबेनगर भागात अली जर्दावाला व गौस इनामदार या दोन चुलतभावांमध्ये संपतीचा जूना वाद आहे. हा वाद मागील सहा ते सात वर्षापासून धुमसत होता. या भागातील गाडेगाव रस्त्यावर गौस इमानदार यांच्या नातेवाईकाची औषधी दुकान आहे. या दुकानासमोर सकाळी ११ वाजता गौस इनामदार व अली जर्देवाला यांच्यात वाद झाला. हा वाद काही वेळापूरता मिटला. 

हेही वाचारेल्वे स्थानकासह शहरातील भिक्षेकरी बेवारस

गोळीने गोळीला उत्तर

मात्र दुपारी चारच्या सुमारास पुन्हा हे एकामेकासमोर आले. सुरवातीला हाणमारी झाली. त्यानंतर पिस्तुलद्वारे गोळीबार करण्यात आला. यावेळी अली जर्देवाला याचा भाऊ महमद जुनेद (वय ३०) हा गोळी लागल्याने जागीच ठार झाला. तर दुसरा भाऊ महमद हाजी याच्या पाठीत दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अली जर्दावाले यांनीही बचावासाठी गोळीबार केला. यात गौस इनामदार हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमींना शासकिय व नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुन्हा जखमीना शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

येथे क्लिक करालॉकडाऊनचे आदेश धुडकावणाऱ्या ५५ जणांविरुद्ध गुन्हे

देगलूर नाका भागात तणावाचे वातावरण

घटना घडल्यानंतर या भागात तणावाचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, इतवारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, नांदेड ग्रामिणचे पंडीत कच्छवे, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर यांनी भेट दिली. घटना नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.  
 
 

loading image
go to top