हिंगोलीच्या व्यापाऱ्याची नांदेडमध्ये आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नांदेड - हिंगोली येथील व्यापाऱ्याने येथील हॉटेलमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

नांदेड - हिंगोली येथील व्यापाऱ्याने येथील हॉटेलमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

हिंगोलीतील कापड व्यापारी गजानन दत्ताअप्पा लिंबाळकर (वय 43) हे कामानिमित्त 26 मार्चला येथे आले होते. रात्री ते हॉटेल निर्मल पॅलेसमध्ये थांबले. आज सकाळी खोलीतून दुर्गंधी येत असल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापक दत्ता कोंडिबा नितनवरे यांनी वजिराबाद पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, फौजदार किरण ठाकरे यांनी खोलीचा दरवाजा तोडून प्रवेश केला असता मृतदेह आढळला. जवळ असलेल्या कागदपत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार नातेवाइकांना कळविण्यात आले.

Web Title: nanded marathwada news businessman suicide