दुसऱ्या दिवशीही वनविभागाकडून अस्वलाचा शोध सुरू

दीपक सोळंके
बुधवार, 21 मार्च 2018

अस्वलाचा शोध घेण्यासाठी जालना, बदनापूर आदी ठिकाणाहून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी बोलविण्यात आले आहे. मात्र, अद्यापही अस्वलाचा शोध लागला नसल्याने गावकरी व शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण कायम असून, अस्वल दिसल्याच्या अफवांनाही आता पेव फुटले आहे.

भोकरदन : भोकरदन परिसरात मंगळवारी (ता.२०) अचानक हल्ला करून तीन जणांना जखमी केलेल्या अस्वलाचा १५ तास उलटूनही शोध लागला नाही. दरम्यान काल रात्री वनविभागाने थांबविलेली शोध मोहीम दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळपासून ८ वाजेपासून ते दुपारी साडे बारा वाजेपर्यंत वनविभागाच्या पथकाने फत्तेपुर गाव परिसरातील नदी, नाले, ओढे, व अडचणीच्या जवळपास आठ ते दहा कि.मी.चा परिसर पिंजून काढला, मात्र अस्वलाचा काही सुगावा लागला नाही. आता फत्तेपुर लगतच्या बाभूळगाव, मनापूर आदी शिवारात पथकाचा शोध सुरू असल्याचे वनपाल संतोष दोडके यांनी सांगितले. अस्वलाचा शोध घेण्यासाठी जालना, बदनापूर आदी ठिकाणाहून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी बोलविण्यात आले आहे. मात्र, अद्यापही अस्वलाचा शोध लागला नसल्याने गावकरी व शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण कायम असून, अस्वल दिसल्याच्या अफवांनाही आता पेव फुटले आहे.

Web Title: Nanded news bear in bhokardan

टॅग्स