भोकर बाजार समितीत स्वीकृत सदस्यासाठी रस्सीखेच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

भाजप-शिवसेनेत स्पर्धा; काँग्रसची एकहाती सत्ता

भोकर (नांदेड): काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर केंद्र व राज्यात भाजप सरकार असल्याचा लाभ घेवून बाजार समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागावी यासाठी भाजप-सेना कार्यकर्त्यांत रस्सीखेच सुरू आहे. इच्‍छुकांनी मुंबईवारी वाढल्याने नेमके कुणाची सरशी होईल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

भाजप-शिवसेनेत स्पर्धा; काँग्रसची एकहाती सत्ता

भोकर (नांदेड): काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर केंद्र व राज्यात भाजप सरकार असल्याचा लाभ घेवून बाजार समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागावी यासाठी भाजप-सेना कार्यकर्त्यांत रस्सीखेच सुरू आहे. इच्‍छुकांनी मुंबईवारी वाढल्याने नेमके कुणाची सरशी होईल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रसला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी महाआघाडी स्थापन करुन लढा दिला; पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. केंद्र आणि राज्यात मागील निवडणुकीत जनतेने मोदी लाट स्वीकारली असली तरी नांदेड लोकसभेत काँग्रस विजयी झाल्याने राज्यात पक्षाची शान ठेवण्यात चव्हाण यांना यश आले. आता भाजप-शिवसेनेने जिल्ह्यातून काँग्रस हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नांदेड जिल्ह्यात भाजपला पोषक वातावरण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भोकर बाजार समितीवर काँग्रसची सत्ता असली तरी भाजप- सेनेला दिलासा देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न सुरू झाल्याचे कळते. स्वीकृत सदस्य निवड करण्याचा अधिकारी सत्ताधाऱ्यांचा हातात असल्याने ती नामी संधी ते सोडणार नाहीत. बाजार समितीवर काँग्रसची सत्ता असली तरी भाजप-सेनेने सत्तेचा लाभ घेण्यासाठी स्वीकृत सदस्य पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू केली आहे. दोन सदस्य निवडता येणार असल्याने इच्छुक असलेल्या सुनील चव्हाण, सुनील बजाज, किशोर पाटील लगळुदकर, माधव शिंदे यांनी वरिष्ठांना गळ घालण्यासाठी मुंबईवाऱ्या सुरू केल्या आहेत. पक्षश्रेष्ठी कुणाच्या नावाला अनुकुल आहेत हे मात्र स्पष्ट नसल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

मामांचा हात पाठीवर
शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण आणि सुनील बजाज यांच्यात स्पर्धा सुरू आहे. यात सुनील बजाज यांचे नाव आघाडीवर असल्याचे कळते. कारण बजाज यांचे मामा माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांकडे आपल्या भाचासाठी राजकीय वजन खर्च केल्याचे बोलले जात आहे. मामाचा हात पाठीवर असल्याने संकटातून मार्ग मिळेल अशी आशा आहे.

मुदखेडला छप्पर फाडके
मुदखेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वर्चस्व आहे. तेथे तर भाजपने बाजार समितीवर चक्क भाजपची सत्ता आणली. प्रशासक म्हणून झेंडा रोवला. त्यामुळे भोकरलाही स्वीकृत सदस्याच्य रुपाने भाजप- सेनेचे दोन संचालकांची वर्णी लागणार हे मात्र निश्‍चित आहे. भोकर पालिकेवर काँग्रसची सत्ता आहे. जवळपास अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप पालिकेचे स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली नाही. यापूर्वी या बाबत हालचाली सुरू झाल्या; पण कुठे माशी शिंकली माहिती नाही. आजपर्यंत त्या निवडीला मुहूर्त लागला नाही. आता येणाऱ्या अडीच वर्षांत तरी हायकमांड यासाठी निर्णय घेणार का? याकडे कार्यकर्त्यांचे लागले आहे.

Web Title: nanded news bhokar bajar samiti election