बनावट परीक्षार्थीप्रकरणी मूळ उमेदवाराला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नांदेड - डमी परीक्षार्थी प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, विक्रीकर निरीक्षक या पदासाठी परीक्षा देणाऱ्या मूळ उमेदवाराला नांदेडमधून सोमवारी (ता. 15) अटक करण्यात आली. त्याच्या नावे भायखळा येथे लातूरचा उमेदवार परीक्षा देत होता. या प्रकरणात लातूर येथील तलाठी नरसिंह बिराजदार यालाही भायखळा पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यभर पसरलेल्या नोकरभरतीच्या बनावट परीक्षार्थी प्रकरणात दोन बनावट विद्यार्थ्यांना भायखळा पोलिसांनी पकडल्यानंतर मूळ उमेदवार असलेल्या संतोष झंपलवाड याला शनिवारी (ता. 13) नांदेड येथे अटक केली. याचप्रकरणात लातूर येथून मध्यस्थ असलेला बिराजदार यालाही भायखळा पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीअंतर्गत नऊ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

Web Title: nanded news crime