नववी, दहावीची तोंडी परीक्षा बंद- राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

नववी, दहावीची तोंडी परीक्षा बंद- राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

नांदेड : नववी,दहावीसाठी यापुढे भाषा विषयासाठी तोंडी परीक्षा बंद करण्यात आली असून नववीसाठी याच शैक्षणिक वर्षापासून तर दहावीसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी केली जाणार आहे.

नववी आणि दहावीच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे मार्क आता बंद होणार आहे. भाषांची तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. दरम्यान, हे बदल यंदा फक्त नववीसाठी असून याची दक्षता शाळांनी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाचा हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठीही लागू होणार आहे.

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सध्या भाषा, द्वितीय भाषांच्या तोंडी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गुण देण्याची मुभा ही शाळांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांकडून अनेक विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत पूर्ण मार्क दिले जात असल्याच्या तक्रारी बोर्डाकडे आल्या होत्या. विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून नववी आणि दहावीच्या वार्षिक निकालही अपेक्षेपेक्षा जास्त लागलेला दिसून येतो आहे. यावर बऱ्याच शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पुण्यात पार पडली होती. त्या बैठकीत परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार आता भाषा विषयांची गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. भाषा विषयांची तोंडी परीक्षा यापुढे न घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com