दूध खव्याला, तर भाजीपाला दावणीला : संपकरी शेतकऱ्यांचा नारा

नवनाथ येवले
बुधवार, 31 मे 2017

सरकारशी बोलणी निष्‍फळ, शेतकरी आज पासून संपावर

बाजार समित्या व आठवडे बाजारावर परिणाम

नांदेड : शेतकऱ्यांच्या आंदोलनात तोडगा काढण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातले शेतकरी आज गुरूवार (ता.१) पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या शेतकरी संपामुळे शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने दूध खव्याला तर भाजीपाला दावणीला असा नारा देत शेतकरी संपात सहभागी होत असल्याने दूध पुरवठ्यासह भाजीपाला आणि अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी किासान सभेच्या अव्हाणाला साद देत राज्यभरातल्या शेतक-यांनी आज पासुन संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली बोलणी निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपाचा निर्णय घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा हे गाव शेतकरी संपाचं केंद्र ठरलंय. गेल्या सहा दिवसांपासून पुणतांब्यातील शेतकरी धरणं आंदोलन करत आहेत. शेतक-यांच्या या संपाला कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच दूध उत्पादक संघानं पाठिंबा जाहीर केला आहे. सारकारच्या शेती विषयी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांवर पुर्वीची बाराबलुतेदारीचा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली आहे. संपाच्या पहिल्या टप्प्यात शेतकरी दूध आणि भाजीपाल्याची विक्री थांबवणार असल्याने रात्री उशीरापर्यंत शहरातील भाजी मार्केटमधे गर्दी दाटली होती.

शहरासह ग्रामीण भागाती आठवडे बाजारावर शेतकरी संपाचा मोठा परिनाम होण्याची शक्यता असल्याने नागरीकांना आगामी काळात नागरिकांना दूध, भाजीपाला, फळ तुटवडा सहन करावा लागणार आहे. शेतकरी संपामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व बाजार समिती आज बंद असणार आहे. त्याशिवाय कृषी सेवा केंद्र आणि बी बियाणं दुकानं देखील बंद राहणार आहेत. तरकारी वाहतूकदारांनी रात्रीच वाहणे थप्पीला लावून आंदोलनात सहभाग घेतलाय. संप यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटना, मराठा सेवासंघासह विविध संघटनांनी तालुका, गावपातळीवर शेतकऱ्यांच्या बैठका घेवून जागृती केली. सोशल मिडीयाच्या जागृतीमुळे शेतकरी तरूणांचा संपात सहभाग वाढला असून संपाचा दहा दिवसाचा पहिला टप्पा यशस्वी करण्यासाठी तरूण शेतकरी संपात सहभागी याशिवाय सोशल मिडीयावरून जागृती करण्यात आली आहे.

साठेबाज व्यापाऱ्यांसाठी तुरखरेदीला मुदत वाढ: तुर उत्पादक शेतकऱ्यांनी गरजेपाई कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना तुर विकली. एखाद्या सधन शेतकऱ्याचा अपवाद वगळता तुर उत्पादन शेतकऱ्यांकडे आजघडीला सापडणार नाही. मात्र तुर उत्पादनाच्या हामी भावाचे भाडवंल करत सरकाने शेतकरी संप शिथील करण्याच्या उद्देशाने तुर खरेदीस मुदत वाढ दिली आहे. गावखेड्यातील शेतकऱ्यांना संपाचा उद्देश आणि मागण्यांची महती पटवून देण्यात येत आले. स्वयंपुर्तीने शेतकरी सहभागी होत असल्याने संपाचा परिनाम सरकाला भोगावा लागणार असल्याचे लालबावटा प्रणीत शेतमजुर युनियनचे उपाध्यक्ष विनोद गोविंदवार यांनी सांगितले.

Web Title: nanded news farmers strike affect agri market