नांदेड शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

नांदेड - नांदेड शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून शहरात प्रचंड दुर्गंध पसरली आहे. ऐन पावसाळ्यात अशी स्थिती कायम राहिली तर आरोग्य समस्या उद्‌भवू शकतात. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त केली असून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नांदेड - नांदेड शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून शहरात प्रचंड दुर्गंध पसरली आहे. ऐन पावसाळ्यात अशी स्थिती कायम राहिली तर आरोग्य समस्या उद्‌भवू शकतात. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त केली असून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

महापालिका प्रशानन व सत्ताधाऱ्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने शहरातील नागरिकांच्या मुलभूत सुविधा पुरविण्यास पालिकेला अपयश आले आहे. शहरातील घनकचरा उचलण्याचे कंत्राट काही दिवसांपासून संपल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. साफसफाई करण्यासाठी महापालिकेकडे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यातच कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहे. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहराच्या सखल भागात पावसाचे पाणी साचत आहे. जागोजागी नाल्या तुंबल्या आहेत. गेल्या आठवड्यात पहिल्यात पावसात संपूर्ण शहरात अनेक भागात पाणी साचले होते. हा अनुभव लक्षात घेऊनही महापालिकेने गेल्या आठवडाभरात काहीही हालचाली केल्या नाहीत. नाले तुंबल्याने गटारातील अस्वच्छ पाणी रस्त्यावर येत आहे.

साचलेल्या कचऱ्याच्या ढीगावर मोकाट जनावरे, कुत्रे, डुकरांचा संचार वाढला आहे. डासांचा प्रादूर्भाव वाढत असल्याने नांदेडकरांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत असून शाहर स्वच्छ करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. घन कचऱ्यांसोबतच रूग्णालयातून निघाणार जैविक कचरा नांदेडकरांसाठी डोकेदुखी बनला आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष घालावे, नाही तर या पावसाळ्यात साथरोगांची साथ पसरुन शहरवासियांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची भिती नागरिक व्यक्त करीत आहेत.

Web Title: nanded news maharashtra news corporation work garbage issue