esakal | नांदेडमध्ये महिला कॉँग्रेसने केला मोदी सरकारचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि खाद्य तेलाच्या किंमती वाढल्याबद्दल केंद्र सरकारचा महिला कॉँग्रेसतर्फे निषेध करून जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी निवेदन देण्यात आले.

नांदेडमध्ये महिला कॉँग्रेसने केला मोदी सरकारचा निषेध

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने Modi Government पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅससह तेलाच्या किंमतीत Fuel Price Hike वाढ करून सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत वाढ केली आहे. त्याचा निषेध करत नांदेड महिला कॉँग्रेसच्या Mahila Congress वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळातर्फे शुक्रवारी (ता.नऊ) निवेदन देण्यात आले. मोदी सरकारने २०१४ पासून सुमारे ६९ वेळा इंधन दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली. बेरोजगारीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. मोदी सरकारच्या 'अच्छे दिन'च्या आश्वासनाचे राख रांगोळी होत आहे.nanded news mahila congress protest against modi government

हेही वाचा: निधी वेळेत खर्च करा, वर्षा गायकवाड यांची प्रशासनाला सूचना

त्यामुळे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि खाद्यतेलाच्या किंमती कमी कराव्यात. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनामध्ये दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष कविता कळसकर, शहराध्यक्ष अनुजा तेहरा, मंगला निमकर, डॉ. रेखा पाटील चव्हाण, पुनिता रावत, संगीता डक पाटील, शिल्पा नरवाडे, मंगळा धुळेकर, जयश्री राठोड, प्रणिता भरणे, शिवनंदा देशमुख, जयश्री यशवंतकर, नाझीना खान आदी उपस्थित होते.

loading image