esakal | निधी वेळेत खर्च करा, वर्षा गायकवाड यांची प्रशासनाला सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

निधी वेळेत खर्च करा, वर्षा गायकवाड यांची प्रशासनाला सूचना

निधी वेळेत खर्च करा, वर्षा गायकवाड यांची प्रशासनाला सूचना

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत २१-२२ या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील Hingoli विकासकामांवर वेळेत खर्च करावा, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड Education Minister Varsha Gaikwad यांनी दिल्या आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवारी (ता.नऊ) बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील MP Hemant Patil, आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर, विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी Hingoli District Collector Ruchesh Jaywanshi, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची बाधा लहान मुलांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.district annual scheme fund spend within time, varsha gaikwada order to hingoli officers

हेही वाचा: वसमत तालुक्यात कापसाचे क्षेत्र घटले, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा व डेल्टा प्लस या विषाणूंचा सामना करण्यासाठी चालू वर्षाचा १२ कोटींचा निधी आरोग्य विभागाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागांनी योग्य नियोजन करुन बेडची व्यवस्था, औषधी, व्हेंटिलेटर आदी सुविधा तयार कराव्यात. जनतेने खबरदारी घेण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करावी. सध्या जिल्ह्यात लेव्हल तीनचे इंटेसिव्ह पेडियाट्रिक केअर युनिट व २० खाटांचे एनआयसीयू तयार करण्यात आले आहे. तसेच २५ स्वतंत्र व्हेंटीलेटर्स, १२४ खाटांचे एस.एन.सी.यू उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्समध्ये समावेश करावा. लसीकरणाची मोहिम राबवावी. लस उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात आला असून याबाबत पाठपुरावा सुरु आहे. या बाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सहभाग घेऊन जास्तीत-जास्त लसीकरण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन करुन तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सज्ज राहावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा: धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनापासून संरक्षण ; कोर्टात अजब दावा

आरोग्य विभागाच्या पदभरतीस स्थगिती असल्यामुळे पदभरती केली नाही. याबाबत पालकमंत्री यांनी आरोग्यमंत्र्यांना भेटून पदभरतीचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे सांगितले. तसेच डायलिसिसची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मंजूर झालेले आयुष महाविद्यालय सुरु करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन दिली असुन, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या केंद्राच्या मंजूरीबाबत आपण सर्व लोकप्रतिनिधींनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करुन प्रयत्न करावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले .

हेही वाचा: कन्नड तालुक्यात पावसाचे पुनरागमन, पिकांना तात्पुरते जीवदान

जिल्ह्यातील शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्याचे नुतनीकरण करण्यासाठी राज्याकडून मराठवाड्यासाठी ७२ कोटीचा निधी मिळणार असून उपलब्ध निधीतून ज्या शाळाचे निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या आहेत. त्या शाळा पूर्ण कराव्यात व जिल्ह्यातील उर्वरित शाळा खोल्यांचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने बैठका घेऊन प्राधान्यक्रम ठरवून करावेत, अशा सूचना यावेळी पालकमंत्री गायकवाड यांनी दिल्या. समिती सदस्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे देयक भरुनही वीजपुरवठा सुरु होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर पालकमंत्री यांनी या प्रश्नी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष घालून सदर वीजपुरवठ्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा.तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राची कामे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक घेऊन आठ दिवसाच्या आत मार्गी लावावेत, अशा सूचना केल्या. तसेच ग्रामपंचायतीच्या ओपन जिमचा तसेच वसमत व कळमनुरी येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न चर्चा करुन सोडवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

loading image