माहूर तिर्थक्षेत्रावर नगरपंचायत कार्यालयाकडून स्वच्छता अभियान

बालाजी कोंडे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

माहूर (नांदेड): महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पुर्ण पीठ असलेल्या माहूर शहरात नगरपंचायत कार्यालयाने स्वच्छता अभियान राबविले. माहूर गडावर नुकतीच ऐतिहासीक परिक्रमा यात्रा संपन्न झाली. यात्रे निमित्त शहरात जवळपास पाच लाख भाविक आले होते.

यात्रा संपल्या नंतर शुक्रवारी (ता. 11) नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या नेतृत्वाखाली टि पॉईट, बसस्थानक, बाजारपेठ, श्री रेणूकादेवी मंदीर कडे जाणारा रस्ता व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ओला, सुका कचरा एकत्र करून शहराबाहेरिल डंपींग ग्राऊंडवर नेऊन टाकण्यात आला. स्वच्छता मोहीमेत मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, अधिक्षक वैजनाथ स्वामी, नगरसेवक ईलीयास बावाणी, स्वच्छता दुत आनंद पाटील तुपदाळे, गणेश जाधव, नं.प. गटनेता रहेमत अली, नगरसेवक रफीक सौदागर, सागर महामुने, नगरसेविका शितल जाधव, पत्रकार सरफराज दोसाणी, निलेश तायडे, प्रतीक कोपूलवार आदी सहभागी झाले होते

Web Title: nanded news mahur renuka devi temple area clean