"सीआरपीएफ' जवानाची लॉजमध्ये आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नांदेड - केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 14) सकाळी नऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या पंजाब लॉजवर घडली. रांजणी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) गावचा रहिवासी आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. जवान बालाजी मल्लिकार्जुन संगापुरे (वय 41) यांची नुकतीच छत्तीसगड येथून मुदखेड येथे बदली झाली होती. मुदखेड येथे रुजू होण्यासाठी ते नऊ सप्टेंबरला मुदखेडकडे निघाले. नांदेड येथे आल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरातील पंजाब लॉजवर ते थांबले.

नांदेड - केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 14) सकाळी नऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या पंजाब लॉजवर घडली. रांजणी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) गावचा रहिवासी आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. जवान बालाजी मल्लिकार्जुन संगापुरे (वय 41) यांची नुकतीच छत्तीसगड येथून मुदखेड येथे बदली झाली होती. मुदखेड येथे रुजू होण्यासाठी ते नऊ सप्टेंबरला मुदखेडकडे निघाले. नांदेड येथे आल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरातील पंजाब लॉजवर ते थांबले. मुदखेडला न जाता येथेच थांबल्याने तब्बल चार दिवसांनी मुदखेड मुख्यालयातून त्यांच्या पत्नीशी संपर्क साधण्यात आला. बालाजी संगापुरे अद्याप रुजू झाले नाहीत, असा संदेश मिळाल्याने घरच्या मंडळींनी चौकशी सुरू केली. 

Web Title: nanded news suicide crpf