‘एटीएम’च्या देवा आता तरी पावशील का ?

शिवचरण वावळे
सोमवार, 15 मे 2017

एटीएमच्या दारात डोकावल्याशिवाय कामावर जात नसल्याचे जिल्ह्यात चित्र

नांदेडः पूर्वीचे लोक घरातून कामाला निघाल्या नंतर रस्त्यात येणाऱ्या देवाला हात जोडून देवदर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नव्हते. परंतू मागील सहा महिण्यापासून ही परिस्थिती जरा उलटच झाली असल्याचे चित्र आहे. पूर्वी सारखे लोक आता मंदीरात कमी अन् एटीएमच्या दारात डोकावल्याशिवाय कामावर जात नसल्याचे दिसून येत आहेत. अन ‘एटीएम’च्या देवा आज तरी पावशील का? असा सवाल करत पडलेल्या चेहऱ्याने अन्.. रिकाम्या हाताने पुढे निघुन जातांना दिसून येत आहेत.

चलनातील सर्वात जास्त मुल्याच्या समजल्या जाणाऱ्या हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा रिझर्व बँकेने बंद केल्या त्यास सहा महीन्याचा कालावधी पूर्ण झाला. परंतू, या सहा महिन्यांनी देखील सर्व सामान्य माणसांची पैशासाठी होणारी फरफट काही थांबलेली दिसत नाही. नोटा बंदीनंतर पाच महत्वाच्या बँकांचे स्टेट बँक आफ इंडीयामध्ये विलिनीकरण झाले. त्यानंतर तरी परिस्थिती सुधारेल आणि सामान्य माणसाला दिलासा मिळेल असे वाटत होते. सध्या नांदेड जिल्ह्यात महिण्यात निव्वळ व्यवहाराकरिता दोनशे 50 कोटी रुपयांची गरज आहे. म्हणजे रोज किमान आठ कोटी रुपये बँकेच्या तिजोरीत असणे गरजेचे अससल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. परंतू, आजची परिस्थिती बघता कधी-कधी बँकेच्या तिजोरीत आठ लाख रुपये देखील शिल्लक राहत नसल्याने जिल्ह्यातील लहान मोठ्या बँकांना पैसे पुरवतांना बँक अधिकाऱ्यांना पैसे वाटप करतांना काटकसर करावी लागत आहे.

वाटप केलेला पैसा परत येण्यासाठी करावी लागते प्रतिक्षा
पैशाचे समान वाटप व्हावे, पैसा सर्वांनाच मिळावा म्हणून रिझर्व बँक महिण्यास किमान दोन वेळा पैसे पाठवत आहे. परंतू, ते अपूऱ्या प्रमाणात आहेत. त्यातून जिल्ह्याची पैशाची गरज पूर्ण भागत नाही. हे खरे असले तरी, बँकेतून ग्राहक आणि व्यापारी उद्योंजकांना देण्यात आलेले पैसे पुन्हा बँकेत परत येत नाही. त्यासाठी बँक अधिकाऱ्यांना लोकांच्या पैशासाठी वाट पहावी लागत आहे.

दोन हजाराच्या नोटा कधीही होऊ शकतात बंद
सध्या चलनात असलेली सर्वात जास्त मुल्याची नवीन दोन हजार रुपयाची नोट रिझर्व बँकेकडून बंद होऊ शकते. त्यामुळे नवीन नोटांच्या बंडलाची थपी लाऊन ठेवणाऱ्यांची आणखी एकदा नोटा बदलण्यासाठी पंचायत होऊ शकते, असे बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: nanded: no money in atm