नांदेडला पोलिस भरतीची लेखी परीक्षा - चंद्रकिशोर मीना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नांदेड - येथे पोलिस शिपाई भरतीसाठीची लेखी परीक्षा पुन्हा होणार असून तारीख, वेळ लवकरच निश्‍चित होणार आहे. गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यानंतर यापूर्वी घेतलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली. 

नांदेडमधील पोलिस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याने महाराष्ट्र पोलिस आणि गृह विभागातर्फे अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी प्रसिद्धिस पत्रक दिले आहे. येथे एक एप्रिलला घेण्यात आलेली लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असून नव्याने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लेखी परीक्षेसाठी उत्तरपत्रिका पुरवणे, त्या ‘ओएमआर’वर स्कॅन करून देण्याचे काम सोपविण्यात आलेल्या एस. एस. जी. सॉफ्टवेअर सोल्युशन्स (पुणे) या कंपनीस परीक्षेचे काम देण्यासाठी कायमस्वरूपी बाद ठरवण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, परीक्षेदरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, पेपर तपासणीचे काम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, लेखी परीक्षेत काही न लिहिता अनेकांना भरपूर गुण मिळाल्याचे कळताच श्री. मीना यांनी चौकशी केली आणि हा गैरप्रकार उघडकीस आणला होता. याप्रकरणी आतापर्यंत पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने सर्वांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: nanded police recruitment written exam chandrakishor meena