नांदेड पोलिसांचा झेंडा नागभूमीत 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

नांदेड : नांदेड पोलिसांचे नाव महाराष्ट्र पोलिसाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहण्यासाठी क्रिडा विभागातील पोलिस परिश्रम घेत असतात. सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या ३१ व्या राज्य पोलिस क्रिडा सुरू आहेत. या स्पर्धेत नांदेड पोलिस दलाच्या महिला खेळाडू रेणूका देवणे यांनी आपल्या स्पर्धकांवर मात करत गोळाफेक व थाळीफेक या प्रकारात सुवर्ण व रजत पदक पटकावले. 

नांदेड पोलिस दलातील हरहुन्नरी महिला पोलिस रेणूका देवणे हीने आतापर्यंत अनेक पदक मिळवून नांदेड पोलिसांची क्रिडा विभागात मान उंचावली. नुकत्याच झालेल्या परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेत लातूर येथे त्यांनी सुवर्ण व रजत पदक मिळविले होते. त्यानंतर लगेच 14 जानेवारी पासून नागपूर येथे राज्यस्तरीय पोलिस क्रिडा स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रेणूका देवणे यांनी गोळाफेक या प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर बुधवारी (ता. 16) थाळीफेक या प्रकारात रजत पदक प्राप्त केले. या प्रकारात कोकण परिक्षेत्राच्या धनश्री धाडे यांनी प्रथम तर रेणूका देवणे यांना द्वितीय तसेच अमरावती परिक्षेत्राच्या त्रीवेणी बेद्रे यांना तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

रेणूका देवणे या सध्या सोलापूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. नांदेड पोलिस दलाचे नाव त्यांनी सुवर्णाक्षरात लिहीले आहे. त्यांच्या या यशाबद्दल आयजी फत्तेसिंह पाटील, एसपी संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्यासह नांदेड पोलिस दलाच्यावतीने अभिनंदन होत आहे.

Web Title: Nanded Police wins in state police sports competition