

Nanded: MLA Anandrao Patil Bondharkar, Superintendent of Police Dr. Neelabh Rohan, MLA Balajirao Kalyankar and jewellers during a meeting to discuss the issues faced by bullion traders.
Sakal
नवीन नांदेड : नांदेड शहरातील सराफा व्यापाऱ्यांच्या विविध समस्या आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या पुढाकाराने सराफा व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. सराफा बाजारातील मुरली मंदिर येथे पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीला सराफा व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.