

नांदेडमध्ये आयोजित 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ' कार्यक्रमात साड्यांचे वाटप करताना मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. या कार्यक्रमात दोन हजार साड्यांचे वाटप होणार होते, परंतु महिलांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यामुळे साड्या कमी पडल्या. या परिस्थितीमुळे महिलांमध्ये संतापाची लाट पसरली आणि कार्यक्रमात गोंधळ झाला.