कोरोनाच्या मुकाबल्यासाठी नांदेडकरांनी दिले ७४ लाखांचे दान

korona virus desease logo.jpg
korona virus desease logo.jpg

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच उपचारासाठी नांदेड जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहायता निधीत ६० लाख ६३ हजार ७९४ निधी प्राप्त झाला आहे. तर पीएम केअरसाठी १३ लाख ७४ हजार ५५१ निधी असा एकूण ७४ लाखांची मदत नांदेडकरांनी केली आहे.

पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांची मेहणत
कोरोना (कोव्हीड १९) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला आहे. कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, राज्यातील शहरात गतीने पसरत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ हे आपल्या सहकाऱ्यांसह रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत.

ऑनलाइन अथवा धनादेशाव्दारे मदत 
कोरोना बाधितांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ या नावे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा फोर्ट मुंबई खाते क्रमांक 39239591720 आयएफएससी कोड SBIN0000300 मध्ये मदत निधी जमा करता येईल. तसेच धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात नांदेड जिल्हा प्रशासनामार्फत व https://cmrf.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईनद्वारे मदत देता येईल. जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहायता निधी व पीएम केअर निधीत मदत दिलेल्या दानशूर व्यक्तीत अनेकांचा समावेश आहे.

देणगीदारांनी दिलं भरभरुन
मुख्यमंत्री सहायत्ता निधीत मुरलीधर उत्‍तरवार एक लाख, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सात लाख १६ हजार ६६६, रामदास होटकर ३३,८७७, ओमकार कन्‍स्‍ट्रशन एक लाख ११ हजार, अध्‍यक्ष व सचिव सुखी सदस्‍यीय निधी गट वसंतनगर एक लाख, अध्‍यक्ष व सचिव सुखी सदस्‍यीय निधी गट वसंतनगर एक लाख, माजी खासदार डॉ. व्‍यंकटेश काब्‍दे पाच हजार, श्रीमती सविता औसेकर पाच हजार, डॉ. व्‍यंकटेश आर. काब्‍दे पाच हजार, डॉ. आदिती काब्‍दे पाच हजार, डॉ. कुजंम्‍मा काब्‍दे पाच हजार, डॉ. अजित काब्‍दे पाच हजार, सुरेश काब्‍दे पाच हजार, सुनिल काब्‍दे पाच हजार, श्रीमती मंगल काब्‍दे पाच हजार, भानुदेव काब्‍दे पाच हजार, नंदकिशोर उपरे पाच हजार, राजेंद्र भागवत पाच हजार,  डॉ. अनंत भोगांवकर पाच हजार, 

जमेल तशी केली नागरिकांनी मदत
मारोती लेगलूरकर  पाच हजार, डॉ. पुष्‍पा कोकिळ पाच हजार, सौ. सविता कलेटवाड पाच हजार, डॉ. डी. यू. गवई पाच हजार, डॉ. बालाजी कोंबाळवार पाच हजार, डॉ. लक्ष्‍मण शिंदे सात हजार, ए. आर. इनामदार पाच हजार, राजेंद्र शुक्‍ला पाच हजार, डॉ. एम. पी. शिंदे २१,१००, बालाजी टिमकीकर दोन हजार, डॉ. अशोक सिध्‍देवाड पाच हजार, अध्‍यक्ष व सचिव श्री गुरूदेव पुरूष बचतगट जवळगाव (ता. हिमायतनगर) दहा हजार, अध्‍यक्ष व सचिव श्री गुरूदेव पुरूष बचत गट जवळगाव (ता. हिमायतनगर) २५५१, अध्‍यक्ष व सचिव श्री गुरूदेव पुरूष बचतगट जवळगाव (ता. हिमायतनगर, २१,०००, मॅनेजर व चेअरमन, नांदेड जिल्‍हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदीविक्री संस्‍था लि. नांदेड ५१ हजार.

देवस्थानचाही मदतीत सहभाग 
सत्यगणपती देवस्थान दाभड (ता. अर्धापूर) २५ लाख, अध्यक्ष कै. रामगोपाल को ऑप इंडस्ट्रियल इस्टेट लि. नांदेड एक लाख, श्री संत गजानन महाराज देवस्‍थान संस्‍थान, तरोडा (खु.) अकरा हजार, मधुकर नल्‍लावार अकरा हजार, अरुण कुलकर्णी अकरा हजार, लड्डूसिंग महाजन एक लाख, सतिश राखेवार (अध्‍यक्ष मार्कण्‍डेय नागरी सहकारी बॅंक लि. नांदेड) ७१ हजार, चेअरमन लेबर कॉन्‍ट्रॉक्‍ट को.ऑप. सोसायटीज फेडरेशन लि. ५१ हजार.

मर्चेट्स बॅंकेकडून मदत
दिलीप कंदकुर्ते (अध्‍यक्ष, नांदेड मर्चेंटस बॅंक) एक लाख ११ हजार, दि. नांदेड डिस्‍ट्रीट सेट्रल को. ऑप.बॅंक लि. नांदेड अकरा लाख, दि नांदेड डिस्‍ट्रीट सेट्रल को. ऑप. बॅंक लि. नांदेड चार लाख १२ हजार पाचशे, नांदेड चेंबर ऑफ कॉमर्स इंडिस्ट्रिज एक लाख, महेश मगर अकरा हजार, सुरेंद्र घोडजकर वीस हजार, शिवाजी पाटील २१ हजार, अध्‍यक्ष परिसर अभियांत्रिकी कर्मचारी सहकारी पतसंस्‍था मर्यादित नांदेड ५१ हजार, कु सिया हुकूमसिंह गहलोत अकराशे, असे एकूण ६० लाख ६३ हजार ७९४ रुपये रक्कम प्राप्त झाली आहे.

पीएम केअर निधीत १३ लाख ७४ हजार
नांदेड जिल्ह्यातून पीएम केअर निधीसाठी मदत दिली आहे. यात अध्‍यक्ष व सचिव श्री गुरुदेव पुरुष बचतगट जवळगाव (ता. हिमायतनगर) २,५५१, विवेक वसंतराव मोगडपल्‍ली ५१ हजार, मधुकर नल्‍लावार पन्नास हजार, दिलीप कंदकुर्ते (अध्यक्ष, नांदेड मर्चेंटस बॅंक) अकरा लाख, सुभाष गादेवार २१ हजार, श्रीमत सदगुरु दासगणू महाराज प्रतिष्‍ठाण दिड लाख, या प्रमाणे एकूण १३ लाख ७४ हजार ५५१ रुपये प्राप्त झाले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com