बलात्कारप्रकरणी नराधमास जन्मठेपेची शिक्षा

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 15 जानेवारी 2020

न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मरेपर्यंत जन्मठेप व रोख दहा हजाराच्या दंडाची शिक्षा मंगळवारी (ता. १४) जानेवारी रोजी सुनावली. याच आरोपीला मागील पंधरा दिवसापूर्वी अशाच एका प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेप याच न्यायालयाने सुनावली होती. 

नांदेड : एका बालिकेवर बलात्कार करणाऱ्या ४३ वरर्षीय नराधमास भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मरेपर्यंत जन्मठेप व रोख दहा हजाराच्या दंडाची शिक्षा मंगळवारी (ता. १४) जानेवारी रोजी सुनावली. याच आरोपीला मागील पंधरा दिवसापूर्वी अशाच एका प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेप याच न्यायालयाने सुनावली होती. 

हिमायतनगर शहराच्या फुलेनगर भागात राहणारा नराधम बालाजी मल्हारी देवकते (वय ४३) याने ता. १६ मार्च २०१९ रोजी सायंकाळच्या सुमारास याच भागात राहणाऱ्या एका सात वर्षीय बालिकेला आमिष दाखवून हिमायतनगर परिसरातील एका शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी मुलगी शेतात रडत असल्याचे एकाने पाहिले. तिला सोबत घेऊन तिच्या पालकाच्या स्वाधीन केले. घडलेला प्रकार पिडीत बालिकेने आपल्या घरी सांगितला. यावरून तिच्या घरच्यांना धक्का बसला. तिला लगेच घेऊन हिमायतनगर पोलिस ठाण्यात येऊन घडलेल्या प्रकऱणाची तत्कालीन पोलिस निरीक्षक यांना सांगितली. पोलिसांनी तत्परता दाखवत तिला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचामिस्त्रीनेही घेतली बक्षीस म्हणून लाच...

बालाजी देवकते विचित्र सवयीचा 

उपचारानंतर तिला परत हिमायतनगर पोलिस ठाण्यात आणून तक्रार दिली. पिडीत बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन नराधम बालाजी देवकते विरूध्द बलात्कार आणि बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास हिमायतनगर पोलिसांनी लावला. आरोपीला अटक केली. त्यानंतर भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधिश एम. एस. शेख यांनी या प्रकरणात दहा साक्षिदार तपासले. वैद्यकीय अहवाल व पिडीत मुलीचे बयान आणि पोलिसांच्या योग्य तपासांआधारे न्या. शेख यांनी नराधम बालाजी देवकते याला मरेपर्यंत जन्मठेप व रोख दहा हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

येथे क्लिक करा - बीड - खून प्रकरणात फरार, आठ महिन्यांनंतर अडकला

पंधरा दिवसापूर्वीच झाली होती शिक्षा 

न्यायाधीश एम. एस. शेख यांनी याच नराधम आरोपीला अशाच एका प्रकरणात मागील पंधरा दिवसापूर्वी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावीली होती. तो सध्या नांदेड कारागृहात शिक्षा भोगत आहे. लहान बालिकांना खाऊचे आमिष दाखवून हा नराधम आरोपी शेतात किंवा कुठल्यातरी आडोशाला नेऊन बालिकांवर बलात्कार करत असे. एकाच पोलिस ठाण्यात त्याच्यावर अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र भोकर न्यायालयाने अखेर त्याची त्याला जागा दाखवली.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naradhamas sentenced to life imprisonment for rape