बीड - खून प्रकरणात फरार, आठ महिन्यांनंतर अडकला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

बीड -  खून प्रकरणातील आठ महिन्यांपासून फरारी असलेल्या आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले. सचिन भबळ्या काळे (रा. हरीनारायण आष्टा ता.आष्टी) असे स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता. 13) पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. उत्तरेश्वर भारत पवार यांच्या खुन प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे.

नागझरी (ता. गेवराई) येथे पैशाच्या देवाण - घेवाणीवरुन उत्तरेश्वर भारत पवार यांचा चार एप्रिल 2019 ला खून झाला होता. सचिन भबळ्या काळे व इतर सहा जणांनी खून केल्याचा गुन्हा नोंद झाला होता.

हेही वाचा - अबब...बीडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी!

यापूर्वी पोलिसांनी वाघ्या झरक्या चव्हाण, गाडेकर झरक्या चव्हाण, झरक्या गणपती चव्हाण (रा. नागझरी) यांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी असलेला सचिन भबळ्या काळे आठ महिन्यापासून फरार होता.

हेही वाचा - राष्ट्रवादीचा वाटा पडला काँग्रेसच्या संजय दौंड यांच्या पदरात

तो नागझरी परिसरात ओळख लपवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखला मिळाली होती. त्यावरून सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने एका पेट्रोल पंपावर सापळा रचून त्यास अटक करून गेवराई पोलीसांच्या ताब्यात दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absconding In Murder Case, Trapped After Eight Months