नरेश पंड्या, डोके यांची "हाता'ला सोडचिठ्ठी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

लातूर - लातूर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे आता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेली अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये असलेले माजी नगरसेवक नरेश पंड्या, विकास सहकारी बॅंकेचे संचालक भानुदास डोके यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसच्या "हाता'ला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचे "कमळ' हातात धरले आहे. 

सध्या राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या काही निवडणुका पक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे पदाधिकारी आता या पक्षात येताना दिसत आहेत. पालकमंत्री निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून शहर जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक नरेश पंड्या, कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष व विकास बॅंकेचे संचालक भानुदास डोके, शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जफर सालार पटेल, राजीव गांधी बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष अंगद कदम, कॉंग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष द्वारकादास सोनी, व्यापारी राजकमल अग्रवाल, रामभाऊ चलवाड, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस आकाश अग्रवाल, सिद्धेश्‍वर देवस्थानचे विश्‍वस्त चंद्रकांत परदेशी, कॉंग्रेस सेवादलचे सचिव बाबूराव बिराजदार, कॉंग्रेस सेवादलचे उपाध्यक्ष शिवाजी भानजी, कॉंग्रेस युवा सदस्य नीलेश पाठणकर, मुरारी पारीख, शहर युवक कॉंग्रेसचे सचिव शेख सुलतान रऊफमियॉं, शहर युवक कॉंग्रेसचे सचिव शेख मुजू रहिमतुल्ला, सुनील सौदागर व डॉ. मधुकर कांबळे यांनी भाजपात प्रवेश केला. 

या वेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, रमेश कराड, मोहन माने, देविदास काळे, अख्तर मिस्त्री, शैलेश गोजमगुंडे, विवेक बाजपाई, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, दगडू साळुंके, हमीद शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

Web Title: Naresh pandya,bhanudas doke leave congress