हातात कॅमेरा आला अन्‌ आयुष्यच बदललं

सुशांत सांगवे
बुधवार, 15 मे 2019

होते, सिने छायाचित्रकार नाथराव रामचंद्र गोमारे. ते मुळचे लातूरचे. त्यांचा जन्म आैसा तालुक्यातील लोदगा या गावात झाला. कामानिमित्त सध्या ते मुंबईत स्थायीक आहेत. ‘सीअायडी’, ‘तुम बीन’, ‘कालचक्र’, ‘जुर्म’, ‘हम तो महोब्बत करेगा’, ‘हिरालाल पन्नालाल’, ‘घायल’ अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सिनेछायाचित्रकार म्हणून काम केले.

लातूर : आमची आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाकीची. त्यामुळं सालगडी म्हणून मी कामाला लागलो; पण दुष्काळामुळं शेतात फारसं काम नसायचं. त्यामुळं मालकाकडं तरी पैसे कसे मागायचे? मग गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खिशात एक रुपयासुद्धा नव्हता. तसाच बसमध्ये बसलो. मुंबईत पोचलो. तिकीट न काढल्याबद्दल कंडक्टरनं दोन तास थांबून राहण्याची शिक्षा केली. त्यानंतर काम मागत फिरत राहीलो. एका स्टुडिओत काचा साफ करायचं, झाडायचं काम मिळालं. ते करत-करत तिथंच प्रथम कॅमेरा हातात घेतला अन्‌ पुढं आयुष्यच बदलून गेलं.

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील ही कथा उलगडत होते, सिने छायाचित्रकार नाथराव रामचंद्र गोमारे. ते मुळचे लातूरचे. त्यांचा जन्म आैसा तालुक्यातील लोदगा या गावात झाला. कामानिमित्त सध्या ते मुंबईत स्थायीक आहेत. ‘सीअायडी’, ‘तुम बीन’, ‘कालचक्र’, ‘जुर्म’, ‘हम तो महोब्बत करेगा’, ‘हिरालाल पन्नालाल’, ‘घायल’ अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सिनेछायाचित्रकार म्हणून काम केले. चित्रपटसृष्टीतील जवळपास गेल्या ४० वर्षातील योगदान लक्षात घेऊन दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशनने त्यांना ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट सिने छायाचित्रकार’ हा पुरस्कार नुकताच प्रदान केला. यानिमित्ताने गोमारे यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

गोमारे म्हणाले, आम्ही जे काम करतो, ते पडद्यामागचे काम आहे. याची कोणी दखल घेईल, असे वाटले नव्हते. पण हा पुरस्कार मिळाल्याने अतिशय आनंद होत अाहे. दुष्काळामुळेच मी वयाच्या १६-१७ व्या वर्षी लातूरबाहेर पडलो. मुंबईत आल्यानंतर फाया स्टुडिओत कामाला लागलो. स्वच्छतेची कामे करत असतानाच माझे मन कॅमेरातही गुंतत गेले. हे स्टुडिओच्या मालकाने बरोबर हेरले. कॅमेरा हाताळण्यामागील बारकावे ते मला सांगू लागले. चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे वेगवेगळ्या नामवंत कलावंतांचा सहवास मिळू लागला. त्यामुळे कॅमेरा हाताळण्यात मी पारंगत झालो. पुढे स्वत:चा स्टुडिओ सुरू केला. हिंदी, तमिळ, भोजपूरी अशा भाषांतील विविध चित्रपटांसाठी काम करता आले. चित्रीकरणादरम्यान वेगवेगळ्या देशांतसुद्धा जाता आले.

Web Title: Nathrao gomare camera work in film industry