‘पद्मावत’ प्रदर्शित; करणी सेनेची हिंसक निदर्शने

पीटीआय
गुरुवार, 25 जानेवारी 2018

जयपूर/मुंबई - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपट आज(गुरुवार) मोठ्या पोलिस बंदोबस्तात प्रदर्शित झाला आहे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा या चार राज्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला नाही. प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी बुधवारी गुरगावमध्ये एका जमावाने शाळेच्या बसलाच लक्ष्य केले. जी. डी. गोएंका वर्ल्ड स्कूलचे सुमारे २० ते २५ विद्यार्थी घरी जात असताना सुमारे ६० जणांच्या गटाने काठ्यांनी बसवर हल्ला केला आणि चालकाला बस थांबविण्यास सांगितले. चालकाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही, तेव्हा त्यांनी गाडीवर दगडफेक केली, अशी माहिती गुरगाव पोलिसांनी दिली.

जयपूर/मुंबई - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपट आज(गुरुवार) मोठ्या पोलिस बंदोबस्तात प्रदर्शित झाला आहे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा या चार राज्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला नाही. प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी बुधवारी गुरगावमध्ये एका जमावाने शाळेच्या बसलाच लक्ष्य केले. जी. डी. गोएंका वर्ल्ड स्कूलचे सुमारे २० ते २५ विद्यार्थी घरी जात असताना सुमारे ६० जणांच्या गटाने काठ्यांनी बसवर हल्ला केला आणि चालकाला बस थांबविण्यास सांगितले. चालकाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही, तेव्हा त्यांनी गाडीवर दगडफेक केली, अशी माहिती गुरगाव पोलिसांनी दिली. यात कोणीही जखमी झाले नाही. 

राजस्थान, हरियाना, महाराष्ट्र अणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील शहरांमध्ये हिंसक आंदोलने करत चित्रपटाच्या प्रदर्शनाला विविध संघटनांनी विरोध दर्शविला. 

भारतीय मल्टिप्लेक्‍स असोसिएशनने राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांत चित्रपट प्रदर्शित केला जाणार नसल्याची माहिती दिली. अहमदाबादमध्ये तीन मल्टिप्लेक्‍सेसच्या बाहेर ३० मोटारगाड्या आणि दुचाकी निदर्शकांनी जाळल्या.

नाक कापणाऱ्याला बक्षीस
उत्तर प्रदेशातील कानपूर क्षत्रिय महासभेने ‘पद्मावत’मधील अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचे नाक कापून आणणाऱ्यास रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले. आम्ही कानपूरवासीयांकडून यासाठी कोट्यवधी रुपये जमा करू, असे महासभेचे अध्यक्ष गजेंद्रसिंह राजवत यांनी सांगितले. मध्य प्रदेशात राजपूत करनी सेनेच्या रतलाम येथील २७ महिला सदस्यांनी जीवन संपविण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले.

Web Title: national news padmavat oppose agitation